आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल : तरुणाला सर्वांसमोर घातल्या गोळ्या, घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरुसलेम - इस्रायलची राजधानी येरूसलेममध्ये पोलिसांनी एका तरुणाला घेरून त्याला गोळ्या घातल्याचे समोर आले आहे. ही घटना जुन्या येरूसलेम शहरात झालेल्या दमिश्क गेटच्या चेकपॉइंटवरील आहे. येथे लाइव्ह कव्हरेजसाठी आलेल्या एनबीसी न्यूजच्या कॅमेऱ्याने ही संपूर्ण घटना टिपली आहे. इस्रायलच्या पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार युवकाने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. तरुण वेस्ट बँक सिटी हिब्रूचा राहणारा 19 वर्षीय बसेल सिदर असल्याचे समोर आले आहे.

व्हिडीओमध्ये काय...
व्हिडीओ फुटेजमध्ये बसेल कॉम्बेट गणवेशात असल्याचे दिसते. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला आणि वारंवार पोलिसांना थांबायच्या सूचना देऊनही तो थांबला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसाप व्हिडीओमध्ये बसेलच्या हातात चाकूही दिसतो आहे.

इस्रायलच्या पोलिसांचा दावा
या घटनेबाबत इस्रायलच्या पोलिसांनी सुरुवातीला सांगितले की, बसेल ने येरुसलेम ओल्ड सिटी फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाच्या खासगी सुरक्षारक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला गोळी मारण्यात आली. त्यानंतर काही वेळानंतर पोलिस प्रवक्ते लुबा सामरी म्हणाले की, पोलिसांनी बसेलला पाहिले जेव्हा तो अत्यंत घाबरलेला दिसून आला. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो त्यांना चाकू दाखवून पळायला लागला. त्यानंतर त्याला गोळी मारण्यात आली. पोलिस प्रवक्ते मिकी रोसेनफेल्ड यांनी ट्विटरवर त्याच्याकडे असलेल्या 7.8 इंचाच्या चाकूचा फोटोही शेअर केला. हा चाकू बसेलकडे होता असा दावा करण्यात आला आहे.

सुपरमार्केटमध्ये एका तरुणाला मारले
येरुसलेममध्ये बस स्टँडवर एका वयस्क महिलेवर हल्ल्यानंतर बुधवारी संध्याकाळीच येथे कमर्शिअर एरियाच्या सुपरमार्केटमध्ये आर्म्ड पोलिसांनी हल्ला केला होता. पिस्तुल आणि असॉल्ट रायफलसह असलेल्या पोलिसांनी एका अरबी तरुणाला गोळ्या घातल्या. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार त्याचेनच बस स्टँडवर या महिलेवर हल्ला केला होता. पॅलिस्टीनी हेल्थ मिनिस्ट्रीनुसार ऑक्टोबरमध्येच आतापर्यंत 30 पेक्षा जास्त पॅलिस्टींचा मृत्यू झाला आहे. 4200 पेक्षा जास्त पॅलिस्टीनी वेस्ट बँक आणि गाझाच्या हिंसक घटनांमध्ये जखमी झाले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...