आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफीमुळे युवकांचे पौरुषत्व संकटात, अश्लील साइट पाहणारा वर्गच बंदी आणण्याच्या विचारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर आयोजित आंदोलनाचे छायाचित्र. फाइल फोटो​
बेलिंडा लुस्कांब- अमेरिकेच्यापोर्टलँडमधील आेरेगावस्थित फायर ब्रिगेडमध्ये काम करणारा २६ वर्षीय नोह चर्चने वयाच्या नवव्या वर्षी इंटरनेटवर नग्न फोटो पाहिले होते. पंधराव्या वर्षी तो व्हिडिआे पाहू लागला. दिवसामागून दिवस तो अधिक कामोत्तेजक व्हिडिआे पाहतच राहिला. महिलांशी शरीरसंबंध ठेवण्याविषयी त्याची रुची कमी होत गेली. पोर्न पाहिल्यावरच त्याच्या शरीरात उत्साह संचारतो. मागील सहा वर्षांपासून त्याची हीच अवस्था आहे. चर्चची अशी धारणा नव्हे, पक्की खात्री झाली आहे की, किशोरावस्थेत त्याने इंटरनेटवर अश्लील व्हिडिआे पाहण्यामुळे त्याच्या अंगात शारीरिक कमजोरी आली आहे.
बहुतांश नोह चर्चसारखे युवक असे मानतात की, किशोरवयात पोर्न त्यांच्या मेंदूला एवढे प्रभावित करते की, त्यांची कामेच्छा थंड पडते. त्यांच्या युवापिढीने या वयात सर्वकाही पाहून घेतले. त्यामुळे त्यांचे मस्तिष्क प्लास्टिकसारखे होऊन जाते. त्यात स्थायी परिवर्तन घडणे शक्य आहे. आता या युवकांनी अशा स्थितीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी पुरुषवर्गाने पोर्न व्हिडिआे पाहण्यास प्रतिबंध करण्यासाठी आॅनलाइन कम्युनिटी ग्रुप, स्मार्ट फोन अॅप आणि शैक्षणिक व्हिडिआे तयार केले आहेत. ब्लॉग आणि पॉडकास्टसोबत सार्वजनिक संवादाच्या सर्व माध्यमांचा वापर सुरू केला आहे.

पोर्नला नेहमी महिलावादी आणि अन्य लोकांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे. परंतु, प्रथमच पोर्नचे सर्वाधिक चाहते ग्राहक त्याच्याविरुद्ध उभे राहिले आहेत. खरंच समाजावर पोर्नचे चिंताजनक प्रभाव शारीरिक कमजोरीच्या काही पटीने जास्त आहेत. ती स्त्रियांच्या अस्मिता आणि प्रतिष्ठेला तडा पाेहोचवते. यौन आक्रमकतेला सामान्य दाखवत आहेत. या मुद्द्यांच्या कारणाने ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी फेब्रुवारीत इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी युजरच्या परवानगीशिवाय प्रौढांसाठीचे अश्लील साहित्य उपलब्ध करून देऊ नये. त्यांनी म्हटले आहे की, पोर्न साइटने आपल्या युजरच्या वयाची पुष्टी करावी किंवा दंड भरण्याची तयारी ठेवावी.
अमेरिकेतील उटा राज्याच्या विधानसभेने पोर्नोग्राफीला जनसामान्यांच्या शरीराला संकट मानण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. नवीन संशोधनाने युवकाच्या या िवचारधारेला खरे ठरवले आहे. डोक्यात शिकण्याची प्रक्रिया, शारीरिक आनंद आणि संगणक हाताळण्याचे कसब यामुळे आॅनलाइन पाेर्नची सवय बनू शकते. याचा पाहणाऱ्याच्या मानसिकतेवर प्रभाव होतो. २८ वर्षीय गेब डीम हा किशोरवयातच पोर्न पाहण्याच्या सवयीचा शिकार ठरला. हळूहळू त्याच्या शरीरातील जाेश, उत्साह नष्ट झाला. त्याने एक फोरम-रीबूट नेशन आॅनलाइन व्हिडिओ चॅनल सुरू केले आहे. तो अशा युवकांना सल्ला मार्गदर्शन करतो, जे पोर्न पाहण्याच्या सवयीमुळे शारीरिकदृष्ट्या कमकुवत ठरले आहेत. एप्रिल २०१५ मध्ये अलेक्झेंडर रोड्सने गुगलची चांगली नोकरी सोडून त्या लोकांना सल्ला देण्यासाठी साइट बनवली जे पाेर्नच्या सवयीशी झुंज देत आहेत. रोड्सही एकेकाळी पोर्नचे शिकार ठरले होते. पोर्नचा विचार केल्याशिवाय त्यांच्या मनात कोणतीही इच्छा जागृत हाेत नव्हती. त्यांची दोन्ही साइट-नोफेप सबरेडिट आणि नाेफेप डाॅट काॅमचे जवळपास दोन लाख सदस्य आहेत. वारंवार पोर्न पाहण्याच्या सवयींमुळे शारीरिक दुर्बलता येते, हे अमेरिकेत नुकत्याच केलेल्या संशोधनाअंती समोर आलेल्या आकड्यांनी सिद्ध झाले आहे. अमेरिका राष्ट्रीय आरोग्य संस्थान (एनआईएच)च्या माहितीनुसार, सन १९९२ मध्ये टक्के पुरुष चाळिसाव्या वर्षी इंद्रियांच्या कमजोरीमुळे पीडित होते. जुलै २०१३ मध्ये जर्नल आॅफ सेक्सुअल मेडिसीनच्या अभ्यासात असे आढळून आले की, २६ टक्के पुरुष ४० व्या वर्षी इंद्रिय कमजोरीमुळे त्रस्त होते. २०१२ मध्ये स्वीत्झर्लंडमधील झालेल्या एका अभ्यासामध्ये १८ ते २५ वयोगटातील एक तृतीयांश लोक या कमजोरीचे शिकार ठरले होते. या निष्कर्षांचे अनेक कारणे असू शकतात. वियाग्रा सारख्या औषधी बाजारात आल्यामुळे इंद्रियांच्या समस्यांप्रति जागरूकता वाढली आहे. डायबिटीज, लठ्ठपणा, अमली पदार्थांचे सेवन आणि दारूच्या अतिसेवनामुळेही अशी समस्या निर्माण होऊ शकते. परंतु, युरोलाॅजी सोसायटीचे माजी अध्यक्ष डाॅ. अजय नांगिया यांनी, या कमजोरीच्या मुळाशी पोर्नोग्राफी असू शकते, याला दुजोरा दिला आहे. अभ्यास झाल्यामुळे पोर्नच्या प्रभावाबाबत विद्यापीठस्तरीय लोकांमध्ये गरमागरम चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण ओरेगॉन विद्यापीठातील प्रो. गैरी विलसनच्या वेबसाइट वायबीओपीडॉटकॉमनुसार युवा आयुष्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये पोर्न पाहतात आणि इंद्रीय दुर्बलतेविषयी माहिती देतात. विलसन सांगतात की, पोर्न आपल्या मस्तिष्कला एवढा प्रशिक्षित करतो की, आपल्याला उत्तेजना आणि आवेग जगायसाठी पोर्नसोबत जुळलेल्या प्रत्येक गोष्टीची आवश्यकता भासते. त्यांचे निरीक्षण आहे की, पोर्न पाहणाऱ्या माणसाची अभिरुची इंटरनेटवर पोर्नवर अधिक आणि वास्तवातील व्यक्तीसोबतच्या संबंधाकडे कमी होत जाते. दुसरीकडे आणखी इतर काही अभ्यासक हे पोर्न आणि इंद्रिय दुर्बलता यांच्यातील संबंधाचा इन्कार करतात. मनोचिकित्सक डेव्हिड जे ले यांनी सांगितले की, वैज्ञानिक तथ्याअभावी या युवकांच्या पोर्नमुळे शारीरिक कमजोरी येते या सांगण्यावर म्हणूनच विश्वास बसत नाही. आपल्या या मांडणीसाठी युवक तीन युरोपीय देशांतील अभ्यासाचा हवाला देतात. मात्र, आतापर्यंतचे संशोधन असे सांगते की, पोर्नोग्राफी आणि शारीरिक कमजोरी याच्यात फारच कमी संबंध आहेत. न्यूरोसायंटिस्ट निकाेल प्राउस हेसुद्धा या समाजाला चुकीचे मानतात. अॅडल्ट इंटरटेनमेंट इंडस्ट्री असोसिएशन, फ्री स्पीच कोएलिशनचे संचालक माईक स्टेबिलेच्या सांगण्यानुसार, एक उद्योग म्हणून आम्ही अनेक नैतिक अपेक्षांचा सामना केला आहे. जर यामध्ये वैज्ञानिकांना काही तथ्य आढळले तर यावर चर्चा होऊ शकते.

कोण पाहतो- अमेरिकेमध्ये१८ ते ३९ वयोगटातील ४६ टक्के पुरुष आणि १६ टक्के महिला पोर्नोग्राफी पाहतात. - मुलेपहिल्यांदा११ ते १३ वर्षांचे असताना पोर्न पाहतात. - जगभरातअॅडल्ट व्हिडिओ साइट पाेर्न हबवर दररोज एक कोटी २० लाख तास पोर्न पाहिले जाते. - २०टक्केपुरुष आणि ३५ टक्के महिलांच्या मतानुसार पोर्नोग्राफी प्रत्येकासाठी बेकायदेशीर असायला हवे.
जगभरात पोर्नोग्राफीला विरोध होत आहे.

युवकांना पोर्न साइटमध्ये जास्त रस
पोर्नसाइटकडे तरुणांचा वाढता कल दिसतो. ब्रिस्टल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार १४ ते १७ वर्षे वयाचे कमाल ४० टक्के ब्रिटिश तरुण नियमित पोर्न फिल्म पाहत असतात. न्यूयॉर्क विद्यापीठातील मीडिया स्टडीजचे प्राध्यापक च्युंग सन यांनी सांगितले की, त्यांनी ज्या ४८७ लोकांचा अभ्यास केला, त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक १३ वर्षांच्या वयापूर्वीच पोर्नशी परिचित झालेले होते.

पोर्नचा उदय स्ट्रीमिंगव्हिडिओच्या व्यापक विस्तारामुळे मोकळे सुस्पष्ट कंटेंट पाहणे त्याच्या शेअरिंगमध्ये वाढ झाली आहे. उत्तेजक फोटो छापणाऱ्या प्लेबाॅयचा खप त्याच्या उत्कर्षकाळात म्हणजेच १९७५ मध्ये ५६ लाख इतका होता. अमेरिकेते १० कोटी लोक दर महिन्याला अॅडल्ट साइट पाहतात.

प्रतितास २४ लाख लोकांची भेट
शारीरिकदुर्बलतेच्या कारणांवर चर्चा होऊ शकते, मात्र मागील दशकात व्हिडिओंच्या माध्यमातून पोर्न साइटपर्यंत जाणे सोपे नव्हते. मात्र, यू ट्यूबसारख्या व्हिडिओ साइटमुळे व्हिडिओ अपलोड डाऊनलोड करण्याची सुविधा मिळाली. यामुळे अश्लील फिल्म पाहण्याची दृष्टी बदलून गेली. एका वेब ट्रेकिंग कंपनीने फेब्रुवारी २००६ मध्ये प्रौढांसाठीच्या साइटवर मासिक कोटी ८० लाख अमेरिकन नागरिकांनी भेट दिल्याचा विक्रम नोंदवला आहे. मागील १० वर्षांत ही संख्या १० कोटी ७० लाख झाली. पोर्नहबने या संकेतस्थळानुसार, प्रतितास २४ लाख लोक त्यांच्या साइटला भेट देतात. २०१५ मध्ये जगातील अब्ज ३९ कोटी २४ लाख ८६,५८० तास त्यांची साइट पाहण्यात आली आहे.