आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दक्षिण चीन सागरी युद्धात सर्वांचा पराभवाचा अटळ’, ट्रान डाइ क्वांग यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर- दक्षिण चिनी सागरी प्रदेशातील संघर्षाचे फलित काहीही निघणार नाही. उलट या युद्धात सर्वांनाच अपयश येईल, असा इशारा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष ट्रान डाइ क्वांग यांनी दिला आहे.

सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेल्या क्वांग यांनी प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर हे वक्तव्य केले आहे. क्वांग यांनी चीन किंवा इतर देशाचा उल्लेख केला नाही. वास्तविक चीनने दक्षिण सागरी भाग मालकीचा असल्याचा दावा सातत्याने करून अशांतता निर्माण केली आहे. त्यावर व्हिएतनाम फिलिपिन्स यांनी आक्षेप घेत वेळोवेळी विरोधही दर्शवला आहे. आशियाच्या दक्षिणेच्या मध्यावर हा सागरी प्रदेश आहे. आशियातील देशांसाठी सागरी प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
बातम्या आणखी आहेत...