आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा परिषदेच्या फेररचनेस विरोध, भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची फेररचना करण्याच्या भारताच्या प्रस्तावाचे समर्थन करत नसलो तरी भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचे अमेरिकेने सोमवारी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्षांनी अनेक वेळा वेगवेगळ्या व्यासपीठावरून भारताचे समर्थन केले आहे, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले.
जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या संघटनेतील सुरक्षा परिषदेत भारताला सदस्य करून घेण्यासंबंधी अमेरिकेची ठाम भूमिका नाही, अशी विचारणा झाली. त्यावर अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहारासंबंधी विभागाच्या निशा देसाई-बिस्वाल यांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा परिषदेच्या फेररचनेचे स्वरूप ठरवणे ही अत्यंत क्लिष्ट बाब आहे. मला त्यावर काहीही बोलायचे नाही. परंतु उभय देश परस्परांचे आंतरराष्ट्रीय भागीदार आहेत. म्हणूनच अमेरिका सुरक्षा परिषदेच्या फेररचनेवर सहमती नसली तरी भारताचा स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याविषयी ठाम आहे. त्याबद्दल देशात दुमत नाही. फेररचनेवर सहमती नाही, याचा अर्थ कोणी स्थायी सदस्य म्हणून भारताला समाविष्ट करू नका, असा काढण्याचे कारण नाही. दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत सामांथा पॉवर यांनी यापूर्वी फेररचनेला तत्वत: पाठिंबा असल्याचे म्हटले होते. परंतु सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्यापूर्वी संबंधित देशाचे योग्यता,क्षमता तपासली पाहिजे.

जपानचा पाठिंबा घेणे म्हणे सर्वात मोठी चूक
बीजिंग । भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढत असल्याची गोष्ट चीनला आता चांगलीच खटकू लागली असावी. म्हणूनच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य होण्यासाठी भारताने जपानचा घेतलेला पाठिंबा ही सर्वात मोठी चूक आहे, अशा शब्दांत चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सने नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचे सध्या ७० वे वर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने जपान, जर्मनी आणि ब्राझील यांच्याशी सलगी केल्याचा आरोपही चीनने केला आहे. हे तिन्ही देश प्रदेशाचे शत्रू आहेत. त्यामुळे भारताने हे करायला नको होते.

असे ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखातून म्हटले आहे. खरे तर १४ सप्टेंबर रोजी नवीन बदलाची मागणी करणाऱ्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राने स्वीकारल्यापासून चीन बिथरल्याचे दिसून येते. सुरक्षा परिषदेतील बदलासाठी भारतासह जर्मनी, जपान आणि ब्राझीलने जोरदार मोहीम सुरू केली आहे.
आयएसच्या विरोधातील लढाईत सहभागी होण्याची अमेरिकेची विनंती
इस्लामाबाद । इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील लढाईत विविध देशांचा सहभाग असलेली मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात सक्रिय होण्याची विनंती अमेरिकेने पाकिस्तानला केली आहे. परंतु त्यावर पाकिस्तानने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. अमेरिकेच्या प्रस्तावावर सरकार किंवा लष्कराकडून कोणतेच संकेत देण्यात आले नाही. सहभागी झाल्यानंतर देशांतर्गत नव्या संघर्षाला सुरुवात होईल का, याचा अंदाज घेण्यात येत आहे. त्यानंतर काही निर्णय घेतला जाईल, असे पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले.

मोहिमेत सहभागाची अमेरिकेची विनंती
इस्लामाबाद । इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील लढाईत विविध देशांचा सहभाग असलेली मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात सक्रिय होण्याची विनंती अमेरिकेने पाकिस्तानला केली आहे. परंतु त्यावर पाकिस्तानने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. अमेरिकेच्या प्रस्तावावर सरकार किंवा लष्कराकडून कोणतेच संकेत नाहीत. सहभागी झाल्यानंतर देशांतर्गत नव्या संघर्षाला सुरुवात होईल का, याचा अंदाज घेतला जात आहे.
आहे. त्यानंतर काही निर्णय घेतला जाईल, असे पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले.