आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तांबूल विमानतळावर हल्ला झाल्यानंतरचे PHOTOS, 38 लोकांनी गमावला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तांबुलमध्‍ये अतातुर्क विमानतळाच्या बाहेर झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटानंतरचे दृश्‍य. - Divya Marathi
इस्तांबुलमध्‍ये अतातुर्क विमानतळाच्या बाहेर झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटानंतरचे दृश्‍य.
इस्तांबूल - तुर्कस्तानच्या इस्तांबूलमधील अतातुर्क विमानतळाच्या बाहेर आत्मघाती स्फोटानंतरची छायाचित्रे समोर आली आहेत. तीन आत्मघाती बॉम्बर्सने हा हल्ला घडवून आणला. यात हल्ल्यात मरणा-यांची संख्‍या 38 झाली असून 150 लोक जखमी झाले आहेत. स्फोटापूर्वी आत्मघाती बॉम्बर्सने गोळीबारही केला. इस्लामिक स्टेटवर (आयएसआयएस )संशय...
- सर्व हल्लेखोर टॅक्सीने विमानतळावर पोहोचले होते. विमानतळाच्या आत शिरण्‍याचा प्रयत्न करत होते.
- त्यांना प्रवेशाद्वारावर सिक्युरिटी एक्स-रे मशीनजवळच सुरक्षा अधिका-यांनी रोखले होते.
- हल्ल्याच्या प्रयत्नात असताना अपयश येत असल्याचे पाहून आत्मघाती बॉम्बर्सने अधिका-यांवर गोळीबार सुरु केला.
- तुर्कस्तान अधिका-यांनुसार, दोन आत्मघाती बॉम्बर्सने टर्मिनलच्या प्रवेशद्वारा स्वत:चा स्फोट घडवून आणला. दुसरीकडे तिस-या हल्लेखोराने पार्किंगमध्‍ये स्फोट घडवून आणला.
- हल्ल्यात मारले गेलेले लोकांमध्‍ये बहुतेक तुर्कस्तानचे नागरिक आहेत. यात काही परदेशी लोकांचा समावेश आहे.
- तुर्कस्तानचे पंतप्रधान बिनाली यिल्दिरिमने हल्ल्याच्या पाठीमागे आयएसआयएसचे हात असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा हल्ल्यानंतरचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)