आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीत पोलिसांवर हल्ला, बाॅम्बस्फोटात ११ जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल - तुर्कीतील ऐतिहासिक शहर मंगळवारी बाॅम्बस्फोटाने हादरले. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस अधिकारी व चार नागरिकांचा मृत्यू झाला. ३६ जण जखमी झाले. रमजान सुरू असतानाच हिंसाचाराची ही घटना घडली.

दंगलप्रतिबंधक वाहनाला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. बेयाझिट जिल्ह्यातील पर्यटन स्थळाजवळ हा स्फोट झाला. ३६ नागरिक जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. व्हेझ्नेसिलर मेट्रो स्थानकाजवळ हा हल्ला झाला. त्यामुळे पर्यटकांत भीती निर्माण झाली आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. परंतु राष्ट्राध्यक्ष रेसिप तायेप एर्डोगन यांनी घटनेमागे कुर्दीस्तान वर्कर्स पार्टीकडे(पीकेके) अंगुलीनिर्देश केला आहे. इस्तंबूलसारख्या महत्त्वाच्या शहराला पीकेकेने लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम्ही दहशतवाद्यांचा मुकाबला करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुर्दीश दहशतवाद्यांनी सातत्याने तुर्कीतील सुरक्षा दलास लक्ष्य केले आहे. परंतु गेल्या काही वर्षांत तुर्कीतील अनेक शहरांवर देखील हल्ले करण्यात आले आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा आेलांद यांनी हिंसाचाराचा निषेध केला आहे. अशा प्रकारच्या कृतीला कोणत्याही परिस्थितीत क्षमा केली जाता कामा नये, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अंकारातील राजदूत जॉन बास यांनी दिली आहे.

ऐतिहासिक वास्तूची हानी
तुर्कीमधील आेट्टोमन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सेहझादे मशिदीचे मात्र या स्फोटांमुळे नुकसान झाले. ही वास्तू १६ व्या शतकातील आहे. मशिदीच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची सूचना देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...