इंटनॅशनल डेस्क- रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली आहे. तेव्हापासून अमेरिकेत हिलरी समर्थकांनी राडा करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या मॅनहटन येथील ट्रम्प टॉवर घराबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे एवढेच नव्हे तर, अमेरिकेत त्यांची हत्या करण्याबाबतचे एक ‘ट्वीट’ वायरल झाले आहे. ज्यामुळे तेथील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. घराच्या परिसात चौफेर कडक सुरक्षा....
- सोशल मीडियात ट्वीट वायरल होताच ट्रम्प यांच्या घराबाहेर व परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली.
- मॅनहट्टन स्थित ट्रम्प टॉवर येथे ‘नो फ्लाय जोन’ घोषित करण्यात आले आहे.
- तसेच, त्यांच्या घराकडे जाणा-या आणि येणा-या सर्व रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. आता येथून बाहेरील व्यक्तीतेथून जाऊही शकत नाही आणि फिरकूही शकत नाही.
- स्थानिक मीडियानी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या शपथविधीपर्यंत येथे त्यांच्या घराबाहेर सुरक्षा राहणार आहे.
- एवढेच नव्हे तर, ट्रम्प टॉवरमध्ये राहणा-या इतर सर्व लोकांवर सिक्रेट सर्विस एजंट्सची नजर असेल.
- ट्रम्प 20 जानेवारी, 2017 रोजी अमेरिकेचे 45 वे प्रेसिडेंट म्हणून शपथ घेतील.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा ट्रम्प यांच्या घराबाहेर कशी आहे सुरक्षा व्यवस्था...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)