आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे स्थायिक व्हा अन् 1.5 लाख रुपये देखील मिळवा, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगभरात वाढत्या लोकसंख्येवरून चिंता व्यक्त केली जात असताना एक देश आपली लोकसंख्या कमी असल्याने चिंतीत आहे. युरोपात असे कित्येक शहर आहेत, ज्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची कमतरता जाणवते. इटलीतील कॅन्डेला शहर त्यापैकीच एक आहे. येथील मेयर लोकांना स्थायिक होण्यासाठी पैसे देण्यासही तयार आहेत. या शहरात एकटे येऊन वसणाऱ्यांना 800 युरो (61 हजार रुपये) आणि सहकुटुंब येऊन स्थायिक होणाऱ्यांना 2000 युरो (1.5 लाख रुपये) दिले जाणार आहेत.

शहराची लोकसंख्या 8000 वरून 2700 वर...
>> कॅन्डेलाच्या मेयर निकोला गट्टा यांनी सांगितल्याप्रमाणे, 1990 मध्ये या शहरात लोकांची रेलचेल होती. आज हे शहर भकास पडले आहे. जुणी स्थिती परत आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. 
>> सुंदर इमारती आणि किल्ल्यांनी सजलेल्या या शहराला एकेकाळी पर्यटक लिटिल नेपल्स या नावाने ओळखत होते. त्यावेळी शहराची लोकसंख्या सर्वाधिक 8000 होती. 
>> मध्यंतरीच्या काळात नोकरी आणि चांगले व्यवसाय करण्यासाठी येथील अनेक युवक आणि युवती दुसऱ्या शहरांमध्ये गेले आणि त्याच ठिकाणी स्थायिक झाले. त्यामुळे, आता या शहराची लोकसंख्या 2700 वर येऊन ठेपली आहे. 
 
 
अशी आहे अट...
>> मेयरने या शहरात स्थायिक होणाऱ्यांसाठी रोख रकमेची घोषणा केली. त्यासाठी लोकांना येथे एक घर भाड्याने घ्यावे लागेल. तसेच त्यांच्याकडे किमान 7500 युरोज (6 लाख रुपये) कमाईची नोकरी सुद्धा असणे आवश्यक आहे. 
>> या ऑफरनंतर शहरात 6 नवीन कुटुंब राहायला आले आहेत. तसेच इतर 5 कुटुंबांनी शहरात येण्यासाठी अर्ज दिला आहे. 
>> मेयर निकोला यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना ही युक्ती इटलीच्या बोरमिडा गावातून सुचली आहे. याच वर्षी त्या गावात सुद्धा स्थायिक होणाऱ्यांसाठी रोख रकमेची घोषणा करण्यात आली होती. 
>> बोरमिडाचे मेयर डॅनिएल गॅलियानो यांनी या वर्षी मे महिन्यात स्थायिक होणाऱ्यांसाठी रोख रकमेची ऑफर दिली होती. डॅनिएल यांना जगभरातून एवढा प्रतिसाद मिळाला की त्यांना ही ऑफर बंद करावी लागली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या शहराचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...