आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इटालियन सुंदरी या भारतीय तरुणावर झाली फिदा, अशी आहे LOVE STORY

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पॅरिसला राहणारी सेफानिया आणि गुजरातच्या नीरज शहा यांची मैत्री फेसबूकवर झाली होती. 4 वर्षे चाललेली ही मैत्री हळू-हळू प्रेमात बदलली. नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता, 10 डिसेंबर रोजी या दोघांचा विवाह पार पडणार आहे. 

 

सेफानियाने शिकल्या गुजराती परंपरा...
> सेफानिया आणि नीरजने अहमदाबादच्या लोकप्रिय ठिकाणांवर जाऊन प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. याच फोटोशूटच्या माध्यमातून त्यांनी आपली लव्ह स्टोरी मांडली आहे. 
> नीरजने सांगितल्याप्रमाणे, सेफानिया आणि त्याची पहिली भेट फेसबूकवरूनच झाली. आणि 4 वर्षे चाललेली ही मैत्री प्रेमात बदलली. 
> याच दरम्यान नीरजने सेफानियासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. डेटिंग करत असतानाच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
> नीरजच्या मनात जे होते, तेच सेफानियाच्या मनातही होती. ती सुद्धा नीरजशी विवाह करण्याच्या तयारीत होती. त्यामुळेच, तिने गुजराती भाषा आणि रुढी-परंपरा देखील शिकल्या आहेत. 
> सेफानिया सध्या पॅरिसला राहत असली तरी, ती मूळची इटलीतील रहिवासी आहे. लग्नाच्या तयारीसाठी ती सध्या अहमदाबादेत आहे.
> सेफानियाने सांगितल्याप्रमाणे, तिचे कुटुंबीय देखील खुश आहेत. लवकरच तिचे मित्र आणि कुटुंबीय गुजरातला येतील. दोघांचा विवाह अहमदाबादेतच 10 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...