आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 तासांनंतर ढिगाऱ्यांत मुलगी जिवंत, वाचा इटली भूकंपातील तीन घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम- मध्य इटलीत भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५० झाली असून या भागातील नॉर्शिया, अॅमाट्राइस आणि अॅक्युमोली ही शहरे पूर्णत: उद््ध्वस्त झाली आहेत. या भागात सर्वत्र प्रचंड धास्ती आहे. लष्कराचे जवान बचावकार्यात उतरले आहेत. एकीकडे ढिगारे उपसण्याचे काम सुरू असले तरी ढिगाऱ्याखाली लोक जिवंत सापडण्याची शक्यता आता मावळत चालली आहे. तरीही या नैसर्गिक आपत्तीवर मात करत काही जण जिवंत सापडले...
पेसकारा डेल ट्रोनटोत बचाव पथकास एक मुलगी दबलेली दिसली. याचा एक व्हिडिओ इटलीतील माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. तो प्रचंड व्हायरल झाला. यात बचाव पथकांनी या मुलीस जिवंत काढल्याचे दिसत आहे.
गेल्या भूकंपानंतर घर बदलले तरी...
अरक्युटा डेल ट्रोनटो | मार्टिना टुरको हॉिलडे होममध्ये पती मासिमिलियानो आणि १८ महिन्यांची मुलगी मारिसोल हिच्यासह सुटी घालवायला आली होती. २००९ मध्ये भ्ूकंप झाला तेव्हा मार्टिना सुदैवाने वाचली होती. तेव्हा ती इतकी घाबरली होती की तिने घरच बदलले. सुरक्षित जागा निवडली. परंतु, भूकंपाने इथेही गाठलेच. नशीब इतके बलवत्तर की या वेळीही ती वाचली.
मुलीने बहिणीसाठी दिले प्राण
पेसकारा डेल ट्रोनटोमध्ये ८ वर्षीय एक मुलगी आपली चार वर्षी बहीण जियोर्जियासोबत आजोळी आली होती. भूकंपाचे हादरे सुरू झाले की सर्व लोक घराबाहेर धावले. मात्र, दोघी आतच अडकल्या. बचाव पथकांनी ढिगारा उपसण्यास प्रारंभ केला. पाहिले तर मोठीने लहान बहिणीला सुरक्षित पकडलेले होते. दुर्दैवाने मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, भुकंपाने उद्ध्‍वस्‍त झालेली शहरे..
बातम्या आणखी आहेत...