आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली भूकंपात 247 ठार, 17 तासानंतर ढिगा-यातून 10 वर्षांच्या चिमुकलीला काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकांनी पूर्ण रात्र रस्त्यावर काढली. - Divya Marathi
लोकांनी पूर्ण रात्र रस्त्यावर काढली.
रोम - इटलीत बुधवारी आलेल्या भूकंपात मृत्यू्मुखी पडलेल्यांची संख्‍या 247 झाली आहे. अनेक लोक आताही बेपत्ता आहेत. रात्रभर लोकांना ढिगा-यातून बाहेर काढण्‍याचे काम चालू होते. मध्‍य इटलीच्या 6 शहरांमधील भूकंपामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. ब-याच ठिकाणी अद्यापही मदत पोहोचलेली नाही. 17 तासानंतर ढिगा-यातून 10 वर्षांच्या एका मुलीला जिवंत बाहेर काढण्‍यात यश मिळाले आहेे. ही घटना पेस्कारा देल रॉतो येथील असून हे ठिकाण उद्ध्‍वस्त झाले आहे. मुलगी सुखरुप...
- पेस्कारा देल रोंतोमध्‍ये बचाव कार्य करणा-या टीमने ढिगा-यामध्‍ये अडकलेली मुलगी जिवंत असल्याचे पाहिल्याबरोबर तिला बाहेर काढण्‍यासाठी प्रयत्न सुरु केले. आश्‍चर्याची बाब म्हणजे तिला कोणतीही जखम झालेली नाही.
- बचाव पथकातील एस्कोली पिसेनोचे फायरफाइटर डॅनिलो डियोनिसी म्हणाले, ढिगा-यातून मुलीला जिवंत बाहेर काढणे ही आनंदाची घटना आहे.
- इटलीच्या नागरिक सुरक्षा विभागानुसार, ठिकठिकाणी इमारतीचेे ढिगारे दिसत आहेत. लोकांनी कॅम्प, घराच्या बाहेर व रस्त्यावर रात्र घालवली. अद्याप काही भागात मदत कार्य पोहोचलेले नाही.
लोकांनी ऐकावली आपबीती
- एका पीडित व्यक्तीने सांगितले, मी भाग्यवान आहे की घराचे छत माझ्यावर पडले. मी उशी आपल्या डोक्यावर ठेवले होते.
- एक महिला म्हणाली, आम्ही पूर्ण रात्र घराबाहेर बसलो आहे. माझे कुटुंबीय कुठे आहे याची मला माहिती नाही.
भूकंपानंतर 200 धक्के बसले
- भूकंपाचे झटके 20 सेकंद होते. यानंतर 200 धक्के बसले. याची तीव्रता 5.2 रिश्‍टर स्केल होती.
- पेस्कारा देल रोंतो गाव उद्ध्‍वस्त झाले आहे. दुसरीकडे एक्युमोली, एमाट्रिस, इन लाजियो, पेस्कारा देल रोंतो, इन मार्श आणि अरक्वॉटा दे ट्रोन्टो जवळपास अर्धे उद्ध्‍वस्त झाले आहे.
एमाट्रिस शहर उद्ध्‍वस्त
- एमाट्रिसचे महापौर सरजो पिरोजी म्हणाले, बचाव टीम ढिगा-यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहे.
- मात्र लोकांना बाहेर काढायला अडचणी येत आहेत.
- एमाट्रिस शहर उद्ध्‍वस्त झाले आहे. शहराला जोडणारे सर्व रस्ते उखडले गेले आहेत. बरेच लोक ढिगा-यात अडकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...