आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात अशा ड्रेसेसमध्ये दिसली ट्रम्प कन्या, उडवली जातेय थट्टा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारत दौऱ्यावर आलेली अमेरिकेची फर्स्ट डॉटर इव्हांका ट्रम्प आपल्या ड्रेसेसमुळे थट्टा मस्करीचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर तिला ड्रेसेसमुळे ट्रोल केले जात आहे. पहिल्या दिवशी इव्हांका तीन वेगवेगळ्या आउटफिटमध्ये दिसून आली. तिचा लुक पारंपारिक भारतीय वस्त्रांनी प्रेरित होता. मात्र, भारतीय लुकच्या नावाने तिच्या ड्रेसेसची मस्करी करण्यात आली अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या आहेत. 

 

> हैदराबाद विमानतळावर तिने व्हाइट एम्ब्रॉइड्रीचे काळे जॅकेट घातले होते. एम्ब्रॉइड्रीतून भारतीय स्टाइल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
> ग्लोबल आंत्रप्रिन्योरशिप समिटमध्ये ती हिरव्या रंगाच्या फ्लोरल पॅटर्नच्या ड्रेसमध्ये दिसून आली. हा ड्रेस इव्हांकाच्या ड्रेसिंग स्टाइलसारखाच होता.
> यानंतर तिने गाला डिनरच्या वेळी फ्लोर लेंथ असलेला गळद्द निळ्या रंगाचा गाऊन घातला होता. त्यावर गोल्डन एम्ब्रॉइडरी होती.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हांकाच्या भारत दौऱ्याचे आणखी फोटोज आणि त्यावरील प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...