आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे. जयललिता ‘आयर्न लेडी’, असंख्य महिलांच्या प्रेरणास्रोत, अमेरिकेतील तामिळींची भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जयललिता म्हणजे आयर्न लेडी होत्या. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात मोठी पाेकळी निर्माण झाली आहे. त्या असंख्य महिलांच्या प्रेरणास्रोत आहेत, अशी भावना अमेरिकेतील तामीळ समुदायाने व्यक्त केली आहे.

भारतीय राजकारणात जयललितांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांना पुढच्या अनेक पिढ्यांच्याही त्या स्मरणात राहतील. त्यांच्यासारखे धाडस कोणत्याही राजकीय पुढाऱ्यास दाखवता आलेले नाही, असे डॉ. राजन नटराजन यांनी म्हटले आहे. मेरीलँडमध्ये उपसचिव पदावर राजन हे कार्यरत आहेत. वाहतूक आयुक्त पदाच्या समकक्ष असे त्यांचे अधिकार आहेत. लोकांनी त्यांच्यावर निरतिशय प्रेम केले. म्हणूनच त्या सर्वांच्या अम्मा होत्या, असे राजन यांना वाटते. अमेरिकेत सर्वोच्च पदावरील राजन हे पहिले तामिळ आहेत.

गेल्या वर्षीची आठवण : दोन देशांतील व्यापार तसेच द्विपक्षीय संबंधाच्या निमित्ताने राजन गेल्या वर्षी २० सदस्यीय शिष्टमंडळासह जयललिता यांना भेटले होते. जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या निमित्ताने ही भेट झाली होती. त्यांच्या करिश्माई व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्याची आठवण डॉ. राजन यांनी सांगितली.

हिलरी प्रभावित : २०१३मध्ये जयललिता व तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात भेट झाली होती. जयललितांचे महिला सक्षमीकरण, नेतृत्वासंबंधीचे विचार ऐकून हिलरीही प्रभावित झाल्या.

बहारदार राजकीय कारकीर्द
जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूतील अनेक दशकांपासून सुरू असलेली बहारदार राजकीय कारकीर्द लोप पावली आहे, अशा शब्दांत मिशिगन विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्रोफेसर राम महालिंगम यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराची चर्चा गैरलागू
जयललिता यांनी आपल्या कारकीर्दीत सर्व स्तरांतील मुली-महिलांसाठी कल्याणाच्या अनेक योजना राबवल्या. त्यामुळे त्यांची भ्रष्टाचारी अशी प्रतिमा रंगवणे केवळ गैरलागू आहे. त्याला अर्थ नाही. त्या असंख्य महिलांच्या प्रेरणास्रोत आहेत, असे श्रीराम मोहन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...