जम्मू - अखनूर सेक्टरमधील जनरल इंजिनिअंरिंग रिझर्व्ह फोर्स (जीईआरएफ) छावणीवर सोमवारी पहाटे दहशतवादी हल्ला झाला. येथील तीन कामगारांना दहशतवाद्यांनी ठार केले. नियंत्रण रेषेजवळ हा परिसर आहे. रात्री १ वाजता हा हल्ला झाला. जीईआरएफची ही छावणी बाट्टाल गावाजवळ आहे. सीमे पलीकडून ही घुसखोरी केली.