आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमधील जनजीवन विस्कळीत, आपण पाहिले नसतील भूकंपाचे एवढे भयानक फोटो....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुमामोटो (जपान) - दोन मोठ्या भूकंपांने जपान चांगलेच हादरले आहे. अनेक इमारती जमीनदोस्त होऊन त्यांचे ढिगारे बनले आहेत. त्यामध्ये अनेक नागरिक गाडले गेल्याची भीती आहे. गुरुवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्‍क्‍यातून जपान सावरत नाही तर, शनिवारी पुन्हा 7 रिश्‍टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा दुसरा धक्‍का जपानच्‍या दक्षिण भागात बसला. 32 जण या भूकंपात ठार झाल्‍याची माहिती मुख्‍य कॅबिनेट सचिवांनी दिली आहे.
- जपानमध्‍ये लहान मोठे असे अनेक भूकंपाचे धक्‍के बसले.
- अनेक ठिकाणी घरे, रस्ते आणि रेल्वे रूळ उद्‌ध्वस्त झाले आहेत.
- काही भागात मोठ्या प्रमाणात भूस्‍खलन झाले आहे.
- इमारतींच्‍या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
- विद्यापीठांमधील वसतिगृहांच्या इमारतीही कोसळल्या आहेत.
- पोलिस, अग्निशामक दले आणि मदत पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे.
- धरण फुटण्याची शक्‍यता गृहीत धरून तेथील 300 नागरिकांना सुरक्षित जागी हलविले.
- जपानला वादळी पावसाचा तडाखा बसू शकतो, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, जपानमधील भूकंपाचे भयानक फोटो....