आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 मिनिटांत स्वच्छ होणारी जपानची ही बुलेट ट्रेन धावेल भारतात, अशी दिसते आतून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानची बुलेट ट्रेन शिन्कानसेन ई-5.... - Divya Marathi
जपानची बुलेट ट्रेन शिन्कानसेन ई-5....
इंटरनॅशनल डेस्क- अहमदाबादमधील साबरमती स्टेडियम ग्राउंडवर गुरुवारी बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे भूमीपूजन झाले. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद याच्यातील 500 किमीचे अंतर दोन तासात गाठेल. या प्रोजेक्टला जपानी कंपनीज मदत करतील आणि ट्रॅकवर शिन्कानसेन ई 5 बुलेट ट्रेन धावेल, जी जपानची हायस्पीड ट्रेन आहे. ट्रेनचे टॉप स्पीट 320 kmph...
 
- टेस्ट दरम्यान या ट्रेनचे स्पीड 400 kmph होते. 2012 मध्ये याचे टॉप स्पीट 320 kmph फिक्स केले गेले.  
- जपानची ही बुलेट ट्रेन 1964 मध्ये आपल्या डेब्यूच्या काळापासूनच सुरक्षिततेसाठी मानली जाते. त्याचा आतापर्यंत कोणताही अपघात झालेला नाही. 
- ई 5 सीरीजच्या नव्या जनरेशनची ही ट्रेन पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि आरामदायक आहे. तिचे डिझाईन बिजनेस आणि लग्झरी कार सर्विसच्या हिशोबाने केले आहे.
- पुढच्या बाजूला या ट्रेनची डिझाईन नावासारखेच आहे, जे 15 फूट बाहेरच्या बाजूने जाते. 
- हे डिझाईन हवेचे प्रेशर कमी करते. तसेच टनेलमध्ये जाताच जास्तीचा आवाज करत नाही. 
- ट्रेनमध्ये बसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तीन क्लास आहेत. यात ग्रॅन क्लास, ग्रीन क्लास आणि ऑर्डिनरी क्लासचा समावेश आहे.  
- ट्रेनमध्ये दहा डब्बे जोडलेले आहेत. ज्यात एकावेळी 731 पॅंसेंजर्स बसण्याची क्षमता आहे. 658 सीट ऑर्डिनरी क्लास, 55 सीट ग्रीन क्लास आणि 18 सीट ग्रॅन क्लासमध्ये आहेत. 
 
फक्त 7 मिनिटात होते ट्रेनची स्वच्छता-
 
या ट्रेनची क्लिनिंग (स्वच्छता) फक्त सात मिनिटात पूर्ण होते अशी व्यवस्थित केली आहे. प्रत्येक कोचच्या स्वच्छतेदरम्यान कर्मचारी एक-एक कोपरा साफ करतात. शिन्कासेन हायस्पीड ट्रेनची स्वच्छता करण्याची जबाबदारी 'टेसेई' जवळ आहे. टेसीजवळ 800 क्लीनर्सची टीम आहे. ज्यांच्या 11 टीममध्ये 22 क्लीनर्स आहेत. प्रत्येक कोचमध्ये क्लीनर विभागले जातात. जेणेकरून ठरलेल्या सात मिनिटांच्या आत तो डब्बा, कोच स्वच्छ व्हावा.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रेनच्या आतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...