आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान : केवळ एका मुलीला जाळेत जाता-येता यावे यासाठी सुरू आहे ट्रेन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होकाइदो (जपान)- भारताच्या असंख्य गावांतील मुले ओबडधोबड रस्त्यांवरून पायीच शाळेत जातात. कारण रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे, परिवहन सुविधाही नाही. मात्र, जपानमध्ये असे नाही. तेथील सरकार आपल्या नागरिकांची पुरेपूर काळजी घेते. याचे ताजे उदाहरण तेथील एका गावात दिसून अाले.

गावातील अवघ्या एका मुलीला शाळेत जाता -येता यावे म्हणून जपान सरकार रेल्वेगाडी चालवत आहे. रेल्वेचे वेळापत्रकही मुलीच्या शाळेच्या वेळेनुसारच ठेवण्यात आले आहे. म्हणजे ज्या दिवशी शाळेला सुटी असते त्या दिवशी ही रेल्वे धावत नाही.

जपानच्या उत्तरेकडील होकाइदो बेटावर असलेल्या कामी शिराताकी गावातील रेल्वे स्थानक बंद करण्याचा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी नोटीसही जारी करण्यात आली होती. कारण दिले होते की, येथे प्रवाशांची संख्या खूप घटली आहे. कामी शिराताकी गाव परिसरात अत्यंत विरळ लोकवस्ती आहे. गावातील एक मुलगी शाळेत जाते. तिला जाण्या-येण्यासाठी कोणतेही साधन नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली तेव्हा त्यांची त्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला दिली. सरकारनेही तत्काळ ही रेल्वेगाडी पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला. ही विद्यार्थिनी जोवर पदवी परीक्षा पास होत नाही तोवर रेल्वे सुरू ठेवण्यासही सांगितले. यानंतर ही रेल्वे रोज गावातून तिला घेऊन शाळेत सोडते आणि शाळेतून पुन्हा गावी आणून सोडते. हे स्थानक आता मार्चपर्यंत बंद होणार आहे. कारण, या मुलीचे ग्रॅज्युएशन या मार्चमध्ये पूर्ण होणार आहे.

ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. एकाने फेसबुकवर लिहिले, जो देश माझ्यासाठी इतके करत असेल त्यासाठी मी मृत्यूलाही कवटाळेन. दुसऱ्याने लिहिले, हे खरे गुड गव्हर्नन्स आहे. ज्याच्यासाठी प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, घटत्या लोकसंख्येमुळे सरकार चिंताक्रांत
बातम्या आणखी आहेत...