आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: महिला प्रवाशांनी कृपया लक्ष द्या, तुम्ही सर्व सुंदर आहात, मात्र रेल्वेत मेकअप चांगले दिसत नाही : जपानी रेल्वे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेकियो - जपान रेल्वेने महिला प्रवाशांना रेल्वेत मेकअप करण्यास मनाई केली आहे. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत म्हटले की, ‘कृपया तुम्ही धावत्या रेल्वेत मेकअप करणे टाळा.’ जपानमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान महिला रेल्वेत तासन््तास मेकअप करतात. यामुळे अनेकदा त्या आपल्या इच्छित स्थानकावर उतरायलाही विसरतात. मेकअपच्या नादात त्यांची रेल्वेही सुटते. याशिवाय मेकअपमुळे अपघात, महिलांशी गैरवर्तन आदी घटनाही घडतात. शेजारी बसलेल्या प्रवाशांनाही याचा त्रास होतो.
महिला याबाबत जागरूक व्हाव्यात यासाठी टोकियो रेल्वे ऑपरेटर कॉर्पाेरेशनने व्हिडिओ आणि पोस्टर जारी केले आहे. ३० सेकंदांच्या व्हिडिओत जपानी अभिनेत्री सावा निमुराने महिलांनी रेल्वेत मेकअप न करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील सर्व महिला सुंदर आहेत, मात्र धावत्या रेल्वेत त्या मेकअप करतात तेव्हा अजिबात चांगल्या दिसत नाहीत, असे व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. निमुरा रेल्वेत नृत्य करत महिलांना विचारते की, तुम्ही रेल्वेत मेकअप करून का येत नाहीत? तुम्ही रेल्वेत आयब्रो सेट करतात. काजळ, पावडर व लिपस्टिक लावता. तुम्ही लूक बदलता तेव्हा अन्य प्रवासी तुम्हाला पाहतात. हे काम तुम्ही घरीही करू शकता. या जाहिराती रेल्वेस्थानकावरील मोठमोठ्या फलकावर दाखवल्या जात आहेत. यासोबत स्थानकावर पोस्टर चिकटवले आहेत. सोशल मीडियावर लोक व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. असे असले तरी काही महिलांचा यास विरोध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या मेकअपची अडचण काय? जपानमध्ये रेल्वे प्रवासात त्रास होण्याच्या कारणांत महिलांच्या मेकअपला आठवा क्रमांक दिला आहे. एका सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमध्ये ४२ टक्के लोक रेल्वेत मेकअप करणे वाईट समजतात.

टि्वट :
जपानी तरुण सिंगल का राहतात हे आता समजले ज्यांना चांगले दिसावे वाटत नाही, त्यांच्यासाठी हा गंभीर मुद्दा आहे.- टिनो

मेकअपला मनाई का केली जातेय? त्या रेल्वेत बऱ्याच वेळ असतात. हा वेळेचा सदुपयोग आहे.
- याकियो

आता कळले की अखेर जपानी तरुण सिंगल का राहतात. कारण रेल्वेत मुली मेकअपमध्ये व्यग्र असतात आणि तरुण त्यांना आकर्षित करू शकत नाहीत. - जॅक्सन

ज्यांच्या शरीराचा दुर्गंध येतो त्यांनाही मनाई केली पाहिजे. - तिनासुकी
बातम्या आणखी आहेत...