आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान बुलेट रेल्वे फक्त 7 मिनिटात होते चकाचक, पाहा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकिओ - जपानच्या शिन्कनसेन बुलेट ट्रेनमध्‍ये काळजीपूर्वक सफाईचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. '7 मिनिट मिरॅकल' शीर्षक व्हिडिओला 27 लाख 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. न्यूयॉर्कचे वार्ताहर चार्ली जेम्सने चित्रित केलेला व्हिडिओ जपान सरकारने 16 जानेवारीला आपल्या यू-ट्यूब अकाउंटवर पोस्ट केला होता. ईएफई न्यूज संस्थेनुसार, या अकाउंटवर हा आतापर्यंत सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ आहे.
व्हिडिओत काय आहे?
व्हिडिओत कशा पध्‍दतीने जपानच्या सर्वाधिक वेगवान रेल्वे केवळ 7 मिनिटांमध्‍ये सफाई कामगार स्वच्छ करतात. यात विशेषत: वेगाने आणि काळजीपूर्वक करण्‍यात आलेल्या सफाई कामावर लक्ष केंद्रीत करण्‍यात आले आहे. व्हिडिओत सफाई कामगार प्रत्येक बोगीत सीटची योग्यरित्या सफाई करताना दिसत आहे.

12 सेकंदात अनेक काम
प्रत्येक सीट स्वच्छ करताना सफाई कामगारांकडे 12 सेकंद असतात. सीट खाली, त्याची दुरुस्ती पुन्हा त्यास पूर्वस्थितीत आणणे अशी कामे असतात.
एका अहवालानुसार, शिन्कासेन प्रत्येक वर्षी 15.5 कोटी प्रवाशी प्रवास करतात. दररोज हा आकडा चार लाखांपेक्षा जास्त असते. ही हायस्पीड रेल्वे जास्तीत-जास्त 54 सेकंद उशीरा येते असे सेंट्रल जपान रेल्वे कंपनी डाटाने स्पष्‍ट केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...