आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचे पंतप्रधान अॅबे यांचा मध्यावधी निवडणुकीचा विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे पुढील महिन्यात मध्यावधी निवडणूक घेण्याबाबत विचार करत आहेत, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. उत्तर कोरियाशी निर्माण झालेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर आपल्याला नागरिकांचा पाठिंबा मिळेल, अशी आशा त्यांना वाटत आहे.  
जिजी प्रेस आणि असाही शिंबूनच्या वृत्तानुसार, अॅबे यांनी सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. तीत त्यांनी २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत मध्यावधी निवडणूक घेण्याची कल्पना मांडली. इतर माध्यमांनीही असेच वृत्त दिले आहे. फक्त त्यांनी डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होईल, असा अंदाज वर्तवला आहे.  

एका व्यावसायिक करारात एका मित्राला मदत केल्याचा आरोप अॅबे यांच्यावर झाला आहे. तेव्हापासून ते राजकीय संकटात आहेत. गेल्या जुलैपासून त्यांची लोकप्रियता खूप कमी झाली होती. पण आता उत्तर कोरियाने वारंवार क्षेपणास्त्राच्या तसेच अणुचाचण्या घेतल्याने जागतिक तणाव निर्माण झाला आहे. अॅबे यांनी या आव्हानाला तोंड देण्याची ठाम भूमिका घेतल्याने आता त्यांची लोकप्रियता हळूहळू वाढत आहे. आता ती ४०% पर्यंत पोहोचली आहे, असे अलीकडेच झालेल्या एका पाहणीत आढळले आहे.
बातम्या आणखी आहेत...