आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या टच डिप्लोमसीचा भाग आहे अॅबे यांचा भारत दौरा, 7 प्रश्नोत्तरांमध्ये जाणून घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो / नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान शिनझो अॅबे बुधवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही दिवस ते गुजरातमध्येच राहतील. मोदी आणि अॅबे एकत्रितरीत्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उद्घाटन करणार आहेत. अॅबे यांचा हा दौरा मुत्सद्दी संबंधांच्या (डिप्लोमसी) दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जात आहे. कारण हा दौरा भारत आणि चीनच्या डोकलाम वादानंतर होत आहे. बुलेट ट्रेन आणि द्वपक्षीय चर्चा व्यतीरिक्त अॅबे यांचा दौऱ्याचे इतर काही पैलू आहेत. त्यापैकी एक म्हणजे, हा दौरा मोदींच्या टच डिप्लोमसीचा भाग आहे. यापूर्वी भारत दौऱ्यावर आलेले अॅबे यांचे स्वागत वाराणसी येथे करण्यात आले होते. गेल्या 3 वर्षांत मोदी आणि अॅबे यांनी 10 वेळा एकमेकांची भेट घेतली. या दौऱ्याचा अर्थ परराष्ट्र संबंधांचे तज्ञ रहीस सिंह यांनी सांगितला आहे. 
 

2014 ची पुनरावृत्ती?
- 2014 मध्ये मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर विकसित देशांपैकी दौऱ्यासाठी सर्वात आधी जपानची निवड केली होती. क्योटो येथून परतल्यानंतर मोदींनी अहमदाबादेत आपल्या वाढदिवसानिमित्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मेजवाणीवर भारतात बोलावले होते. 
- 3 वर्षांनंतर अगदी तशीच परिस्थिती आहे. यावेळी मोदी चीनमध्ये ब्रिक्स समिट करून भारतात परतले आहेत. तसेच त्यांनी 17 सप्टेंबरला असलेल्या जन्मदिनाच्या 4 दिवसांपूर्वी अॅबे यांना गुजरातमध्ये बोलावले आहे. 
 

गुजरातमध्ये मेजवाणीचा अर्थ टच डिप्लोमसी
- परराष्ट्र व्यवहारांचे तज्ञ रहीस सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, ''शिनझो अॅबे यांचे स्वागत दिल्लीत करण्याऐवजी मोदींनी अहमदाबादची निवड केली आहे. गुजरातमध्ये मोदींचे घर आहे. असे करून मोदी अॅबे यांना भारत आणि जपानमध्ये असलेल्या जवळिकतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच याला टच थेरेपी असेच म्हणता येईल. यापूर्वी मोदींनी शी जिनपिंग यांनाही गुजरातमध्येच बोलावले होते. 
- ''अॅबे यांचा हा दौरा पाहता मुत्सद्दी आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून तो दोन प्रकारे अत्यंत महत्वाचा आहे. पहिले म्हणजे, भारताला तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी जपानची मदत लागणार आहे. दुसरे म्हणजे, भारत आणि चीनमध्ये वाढता वाद पाहता त्याचे संतुलन साधणे तसेच चीनला आम्ही सुद्धा कमी नाही असा संदेश पाठवणे."
- ''लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी लष्कराला नुकतेच दोन मोर्चांवर तयार राहण्याचे आदेश दिले होते. तो अप्रत्यक्षरीत्या सरकारला संदेश होता, की भारताने जपानसोबत लष्करी आणि संरक्षण संबंध सुद्धा प्रगल्भ करावे. भारत, अमेरिका आणि जपानमध्ये यापूर्वीही संयुक्त युद्ध सराव झाले आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये महत्वाचे संरक्षण करार होऊ शकतात.''
 
 
अॅबे यांच्या भारत दौऱ्याचा अर्थ 7 पॉइंट्समध्ये जाणून घ्या
1) कसे आहेत भार आणि जपानचे संबंध?
बौद्ध धर्मामुळे सहाव्या शतकापासूनच भारत आणि जपानचे संबंध वाढण्यास सुरुवात झाली. आधुनिक युगाच्या इतिहासात दोन्ही देशांच्या संबंधांची सुरुवात 1949 पासून झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर केवळ भारतासोबत जपानने पहिला शांतता करार केला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी टोकियोच्या प्राणी संग्रहालयात एक हत्ती भेट म्हणून दिला होता. 1952 पासून दोन्ही देशांचे दूतावास कार्यालये सुरू झाले.
 

2) अॅबे यांच्या भारत दौऱ्याने काय होणार?
- 13 सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये येणारे अॅबे त्याच दिवशी संध्याकाळी मोदींसोबत साबरमती आश्रमला जातील. त्यांच्या स्वागतात रात्रीभोज आयोजित करण्यात आला आहे. 
- 14 सप्टेंबरच्या सकाळी साबरमती रेल्वे स्टेडियममध्ये मोदी आणि अॅबे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमीपूजन करणार आहेत. हा प्रकल्प 1.10 लाख कोटी रुपयांचा आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होण्यानिमित्त 15 ऑगस्ट 2022 रोजी ही ट्रेन चालवण्याचे लक्ष्य आहे. 
- मोदी-अॅबे व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून बडोद्यात हाय-स्पीड रेल्वे ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. गुरुवारी दुपारी दोघे दांडी कुटीर संग्रहालय पाहण्यासाठी जाणार आहेत. 
- यानंतर गांधीनगरच्या महात्मा मंदिरात मोदी आणि अॅबे चर्चा करणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेते भारत-जपान स्पेशल स्ट्रॅटेजिक अॅन्ड ग्लोबल पार्टनरशिप अंतर्गत नुकतेच झालेल्या कार्यक्रमाचे अवलोकन करणार आहेत. 12 वे भारत-जपान संमेलन अहमदाबाद येथेच पार पडणार आहे. 
- गुजरातच्या साणंद आणि मंडल येथे जपानी औद्योगिक पार्कसाठी एमओयू करार होणार आहे. यातून 25 हजार कोटींची गुंतवणूक मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. साणंदच्या खोराज येथील 1750 एकरमध्ये जपान-इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बनवले जाणार आहे. पुढची 10 वर्षे या ठिकाणी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. 
- अॅबे सुझुकी मोटर्सची एक कार फॅक्ट्री आणि लीथियम-आयन बॅटरी प्रकल्पाचे सुद्धा उद्घाटन करणार आहेत. गुरुवारीच मोदी आणि अॅबे इंडिया-जपान बिझनेस फोरमला संबोधित करतील. रात्री सीएम विजय रुपाणी अॅबे यांच्या सन्मानार्थ डिनर देणार आहेत. 
 
 
3) आणखी काय अपेक्षा?
- भारत-जपानमध्ये सागरी संरक्षण करार होऊ शकतात. नौदलासाठी US-2 सागरी विमान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. तसेच नागरी अणुऊर्जेवर सुद्धा करार होऊ शकतात. 
 

4) भारतासाठी जपान किती महत्वाचा?
- चीनसोबत नुकताच झालेल्या डोकलाम वादात मोठ-मोठे राष्ट्र संतुलित भाष्य करत होते. एकट्या जपाननेच जाहीरपणे भारताला या प्रकरणी पाठिंबा दिला होता. 
- गेल्या 10 वर्षांत भारतामध्ये होणारी जपानची परदेशी गुंतवणूक 6 पटीने वाढली आहे. जपान भारतातील तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. 2016-17 मध्ये जपानने भारतात 4.7 अब्ज डॉलर गुंतवले आहेत. यापैकी 3.3 अब्ज डॉलर एकट्या गुजरातमध्ये करण्यात आली आहे. भारतात सद्यस्थितीला जपानच्या 1200 कंपन्या सुरू आहेत. 
- जपानसोबत भारताचा नागरी अणु करार आहे. जपान भारतात अणुऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करू शकतो. 
- जपान भारताला किमान 12 स सी-प्लेन (सागरी विमान) विकणार आहे. नौदलासाठी असलेल्या या विमानांसाठी दोन्ही देशात किमान 10 हजार कोटी आहे.
- ईशान्य भारत आणि अंदमान-निकोबार आयलंडवर गुंतवणूक करण्याची परवानगी असलेला जपान एकमेव राष्ट्र आहे.
 

5) बुलेट ट्रेनवर एवढा भर का?
- जपान:  जपान इंडोनेशियात अशाच प्रकारचे करार मिळवण्यास इच्छुक होता. मात्र, ते प्रकल्प चीनने मिळवले आहेत. त्यामुळे, जपानसाठी मुंबई-अहमदाबाद प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. 
- भारत: 160 वर्षे जुन्या असलेल्या भारतीय रेल्वेत बुलेट ट्रेन क्रांती घडवून आणणार अशी अपेक्षा केली जात आहे. या ट्रेनसाठी होणाऱ्या 98 हजार कोटींच्या खर्चावर सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र, जपान यासाठी केवळ 0.1 टक्के व्याजाने 50 वर्षांसाठी 88 हजार कोटींचे कर्ज देत आहे. अर्थात हा कर्ज अतिशय स्वस्तात भारताला मिळत आहे. त्यातच मेक इन इंडिया तत्वावर बनणाऱ्या या ट्रेनचा खर्चही वाचणार आहे. 
 

6) भारत-जपानच्या जवळिकतेचे कारण चीन?
- इंडियन ओशन रीजनमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. ते थांबवण्यासाठी जपानसारख्या देशांची भारताला गरज आहे. दुसरे म्हणजे, साउथ एशियात सुद्धा चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. चीन श्रीलंकेत बंदर उभारत आहे. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. 
- चीन वन बेल्ट, वन रोड प्रोजेक्ट (OBOR) च्या माध्यमातून अनेक देशांशी आपला संपर्क आणि दळण-वळण वाढवत आहे. यास प्रत्युत्तर देण्यासाठी जपान एशिया-अफ्रीका ग्रोथ कॉरिडोर (AAGC) वर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यात जपानला भारताची सुद्धा गरज आहे. 
7) मोदींच्या काळात विकसित देशांचे किती नेते भारतात आले?
- नोव्हेंबर 2016 मध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदी पीएम बनल्यानंतर देशात आलेले इतर नेते...
बातम्या आणखी आहेत...