आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वेल कम यू , मी आहे रोबोट रिसेप्शनिस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकिओ - माझे नाव आयको चिहिरा आहे...तुम्ही कसे आहात.सोमवारी(ता.20) टोकिओच्या पॉश्‍ा भागातील जपानच्या सर्वात जुन्या डिपार्टमेंटल स्टोरमध्‍ये वरील वाक्यात एका रोबोट रिसेप्शनिस्टने ग्राहकांचा स्वागत केला. ते एक अँड्रॉईड रोबोट असून तोशिबा या कंपनी ते विकसित केले आहे. जपानमध्‍ये मागील वर्षी एका तंत्रज्ञान मेळाव्यात संबंधित रोबोट रिसेप्शनिस्ट ओळख करुन देण्‍यात आली.

आयको रेकॉर्ड केलेले शब्द बोलते.माणसाप्रमाणे तिला लूक देण्‍यात आला आहे. तिचे हावभाव सहज दिसतात. आयको हसू शकते आणि गाणीही गाऊ शकते,असे तोशिबाने सांगितले. मात्र ती मंगळवार पर्यंतच ग्राहकांचे स्वागत करेल. यानंतर गोल्डन व‍ीक हॉलिडे दरम्यान तिचा जहिरातींसाठी उपयोग केला जाणार आहे.

तोशिबाचे प्रमुख हितोशी तोकुदा म्हणतात, की आम्हाला असा रोबोट बनवायचा आहे, जो माणसाप्रमाणे दिसेलच. पण त्याच्याप्रमाणे हालचालीही करेल. ते पुढे म्हणाले मित्सुकोशी निहोम्बाशी डिपार्टमेंटल स्टोरमध्‍ये कस्टमर सर्व्हिस खूप उत्कृष्‍ट आहे. येथे एक रोबोटला मिळत असलेला रिस्पॉन्स पाहणे एक चांगली संधी होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्राहकांचे स्वागत करत असलेल्या रोबोटचे फोटोज...