आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानचे योशिनोरी आेसुमी यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम/ टोकियो - जपानचे जैव-वैज्ञानिक योशिनोरी आेसुमी(७१) यांना यंदाचा वैद्यकीय संशोधनासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आेसुमी यांनी टोकियो विद्यापीठातून १९७४ मध्ये पीएचडी केली होती. सध्या ते टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कार्यरत आहेत. जपानला २५ वा नोबेल पुरस्कार मिळत असून सलग तिसऱ्या वर्षी देशाला हा बहुमान मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे आेसुमी हे चौथे जपानी आहेत. त्यांना पुरस्कार स्वरूपात ८० लाख स्वीडिश क्रोनर(अंदाजे ६.९४ कोटी रुपये), प्रशस्तिपत्र आणि पदक बहाल करण्यात येईल. गेल्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल सतोशी आेमुरा यांना मिळाले होते. त्यापूर्वी भौतिकशास्त्रातील नोबेल जपानी वैज्ञानिक इसामू अकासाकी, हिरोशी अमानो आणि जपानवंशीय अमेरिकन शुजी नकामुरा यांना मिळाले होते.

मेकॅनिझम ऑफ ऑटोफेगीमुळे टळते पार्किन्सन्स, मधुमेह
आेसुमी (७१) यांनी मानवी शरीरातील कोशिकांचा शोध लावला आहे. त्यांनी शरीरातील स्वत:चेच भक्षण करणाऱ्या पेशी शोधून काढल्या आहेत. त्यामुळे विषद्रव्यांचा खात्मा होतो. अथवा त्यावर उपचार केले जातात. याला मेकॅनिझम ऑफ ऑटोफेगी असे म्हटले जाते. ही पेशींची पुनर्निर्मिती प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया थांबली तर पार्किन्सन्स आणि मधुमेहासारखे आजार जडू शकतात. संशोधकांनी १९६० च्या दशकात काही पेशी स्वत:च्या अस्तित्वाला नष्ट करतात असा शोध लावला होता. आपल्याच पटलात संकोचून लाइसोसोम नामक पुनर्निर्मिती विभागाकडे त्या ढकलल्या जातात. नोबेल पुरस्कार देणाऱ्या ज्यूरींनी सांगितले की, ‘आेसुमींच्या संशोधनाने पेशी आपल्या तत्त्वांना कसे रिसायकल करतात यावर प्रकाश टाकला आहे. ’

यामुळे काय होणार
केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे उपसंचालक प्रो. डेव्हिड रेंबिज्टीन यांनी सांगितले की आेसुमीचे संशोधन कर्करोग, हंटिंग्टन आणि अल्झायमरसारख्या रोगांना रोखण्यासाठी मूलभूत व महत्त्वाची माहिती देणारे आहे.

लोकप्रिय विषयांवर संशोधनाची मला सवय नाही
आेसुमींनी मुलाखतीत सांगितले की, ‘मी वैज्ञानिकांशी प्रतिस्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे नवे विषय शोधून काढतो. इतर कुणीच करू शकत नाही ते करण्यात मला रस आहे. ऑटोफेगीवर मी काम सुरू केले तेव्हा वैज्ञानिकांसाठी हा फारसा स्वारस्याचा विषय नव्हता. तुम्ही कोणतेही काम हाती घेतले तर त्याला बाराखडीपासून सुरू करा.’
बातम्या आणखी आहेत...