आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japans Shinkansen Bullet Train Hit By Fire In Suicide Attempt

चालत्या बुलेट ट्रेनमध्ये दोघांचा मृत्यू, प्रवाशाने स्वतःला पेटवून घेतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकिओ - जपानच्या शिंकानसेन बुलेट ट्रेनमध्ये स्वतःवर ऑइल ओतून घेत पेटवून घेतलेल्या प्रवाशासह एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय नऊ जण जखमी झाले आहेत.

ट्रेनमध्ये किती प्रवासी
16 बोगींच्या या ट्रेनमध्ये 1000 प्रवासी होते. टोकिओहून ओसाकाला जाणाऱ्या ट्रेनला टोकिओ सोडून फक्त 30 मिनीट झाले होते. बुलेट ट्रेनला आग लागल्यामुळे गाडीला ओडाव्हारा स्टेशनवर थांबवण्यात आले आहे. ट्रेनला लागलेल्या आगीमुळे सगळीकडे धुराचे साम्राज्य निर्माण झाले आणि त्यामुळे दोन जणांना हार्ट अॅटॅक आल्याचे ओडाव्हारा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जपान रेल्वे प्रवक्त्याने बीबीसीला सांगितले, की ट्रेनमधील एका प्रवाशाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. यामुळे टोकिओहून ओसाकाला जाणाऱ्या ट्रेनला आग लागली. सहप्रवाशाने आपत्कालिन बटन दाबल्यामुळे ट्रेन थांबवण्यात आली.
जापानच्या एनएचके वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये ट्रेनच्या डब्यातून धुरांचे लोळ उठताना दिसत आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता ही दुर्घटना झाली. वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी शिंकानसेन बुलेट ट्रेन प्रसिद्ध आहे. या ट्रेनचा ताशी वेग 320 किलोमीटर आहे.