आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिमांच्या सर्वात पवित्र मदीना मशिदीसह 3 ठिकाणी आत्मघातकी हल्ला; 36 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध- सौदी अरेबियातील मुस्लिम धर्मीयांच्या सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मदिना शहरातील प्रेषितांच्या मशिदीसमोर सुरक्षा रक्षकांच्या पार्किंग लॉटमध्ये सोमवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. तसेच दोन हल्ले जेद्दा शहरात अमेरिकन दुतावास व अल कातिफमधील शियावर झाले. यात 36 जणांचा मृत्यू झाला, तर 150 जण जखमी आहेत.

गल्फ न्यूजनुसार, एका हल्लेखोराने मशिदीसमोर स्वत:ला उडवून घेतले. यात त्याच्यासह दोन सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. सुसाइड बॉम्बर हा पाकिस्तानी असल्याचे सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

अल-अरेबिया वृत्तवाहिनीच्या थेट प्रक्षेपणानुसार मशिदीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याचे दृश्य होते. तत्पूर्वी, सौदीतील कातिफ शहरात एका शिया मशिदीसमोर आत्मघाती स्फोट घडवण्यात आला.

हल्ला झाला त्या भागात अनेक देशांचे दुतावास आहेत. तसेच शहरातील सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. हल्लेखोराने रुग्ण असल्याचे सांगून अमेरिकेच्या दुतावासात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारवर तैनात सुरक्षा रक्षकांनी त्याला चौकशीसाठी थांबवले असता त्याने कारमध्ये स्वत:ला उडवून स्फोट घडवून आणला. घटनेनंतर परिसर सर्च ऑपरेशन सुरु करण्‍यात आले आहे.

दरम्यान, 2004 मध्ये जेद्दाह शहरात अतिरेक्यानी हल्ला केला होता. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज...तीन बॉम्बस्फोटांनी असे हादरले मुस्लिम धर्मियांचे सर्वात पवित्र स्थळ
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...