आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लायमेट चेंज : श्रीमंत देशांनी जास्त खर्च करावा : अर्थमंत्री जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - वातावरण बदलासंबंधी सर्वात जास्त जबाबदारी श्रीमंत देशांची आहे. त्यामुळे त्यांनीच जास्त खर्च केला पाहिजे. साधनांचा वापर स्वच्छ तंत्रज्ञानाच्या विकासासाठी करायला हवा. त्याचबरोबर वातावरण बदलाच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी गरीब देशांना ते मदतही करू शकतात, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते शनिवारी वर्ल्ड बँक आणि आयएमएफच्या बैठकीत बोलत होते. त्यात विविध देशांच्या अर्थमंत्र्यांनी सहभाग घेतला होता.
वातावरणात उष्णता वाढल्याचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसणार आहे. त्यामुळेच भारत आपले योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु श्रीमंत देश आमच्या तुलनेत अधिक सहजतेने हा बदल स्वीकारू शकतात. हरित तंत्रज्ञानाचा विकास युद्धपातळीवर करण्याची गरज आहे.
वातावरण बदलाची समस्या दोन पातळीवर बघता येऊ शकते. गरीब देशांची ऊर्जेची गरज आणि ग्रीन हाऊस उत्सर्जन कमी करणे. ऊर्जेच्या मुद्द्यावर विकसनशील देशांना कार्बन उत्सर्जनात अधिक सूट द्यावी.