आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला, 3 वर्षांत बनवली 6 हजार कोटींची कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फोर्ब्स मासिकाच्या ताजा अंकाच्या मुखपृष्‍ठावर अमेरिकन अभिनेत्री जेसिका अल्बा झळकली आहे. मासिकाने त‍िला अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला असल्याचा म्हटले आहे. ऑनेस्ट कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या जेसिकाची एकूण संपत्ती 1 हजार 263 कोटी रुपये आहे. तिने कंपनीची सुरुवात 2012 मध्‍ये केली होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीचे मूल्य 6 हजार 317 कोटी रुपया पार केले आहे. हे सर्व केवळ तीन वर्षांत घडले. कंपनी डायपर, वाइप आणि लहान मुलांचे वस्तूंचे उत्पादन घेते. फोर्ब्सने अमेरिकेच्या 50 सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत हॉलीवूडचे बियोन्स, फेसबुकच्या शेरील सेंडबर्ग आणि जज जूडीचाही समावेश आहे.

अभिनेत्री ते उद्योग सम्राज्ञीपर्यंतचा प्रवास
34 वर्षांच्या जेसिकाची अभिनेत्री ते उद्योग सम्राज्ञीपर्यंतचा प्रवास खूप रोचक आहे. 13 वर्षांपासून तिने अमेरिकेत टीव्ही आणि चित्रपटात काम करण्‍यास सुरुवात केली. 2008 मध्‍ये चित्रपट निर्माते कॅशर वॉरनपासून मुलाला जन्म दिला. एकदा तिची आई कॅथीने जेसिकाला मुलाला आंघोळीच्या दरम्यान कपडे धुण्‍याची पावडरने स्वच्छ करण्‍याचा सल्ला दिला होता. येथून तिला उद्योगाची कल्पना सुचली आणि ऑनेस्ट कंपनीचा पाया घातला गेला.

बालपणातील आठवणींने घेतला धडा
बालपणाबाबत बोलताना जेसिका म्हणते, की लहानपणी ती खूप संवेदनशील होती. अनेक मुलासाठीचे उत्पादन त्याना सोईचे ठरत नाही. जसे न्यूमोनिआ आणि अस्थमा. आईने धुण्‍याच्या पावडरविषयी बोलल्यावर मला अशीच नैसर्गिक आणि पर्यावरणस्नेही उत्पादनाचा विचार डोक्यात आला. बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि तेलासारखे उत्पादन सुरु केले. नंतर जेसिकाने ख्रिस्तोफर गेव‍िगन, वेब आंत्रप्रुन्योर ब्रायन ली आणि सीन केनबरोबर 37 कोटी रुपयांची कंपनी सुरु केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जेसिका अल्बाशी संबंधित फोटोज..