आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Kerry In Iran For Meeting Related To Atomic Deal

इराणवरील निर्बंध हटतील : झरीफ, आण्विक समझोत्याासंदर्भात व्हिएन्नात बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान - गेल्या वर्षी झालेल्या आण्विक समझोत्यावरील आढाव्याच्या बैठकीत इराणवरील निर्बंध हटवण्यात येतील, असा विश्वास इराणचे संरक्षणमंत्री मोहंमद जावेद झरीफ यांनी व्यक्त केला. ते व्हिएन्नात पत्रकारांशी बोलत होते. निर्बंध हटवण्यात आल्यास हा देशासाठी आणि प्रादेशिकदृष्ट्या अत्यंत चांगला दिवस असेल, असे झरीफ यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रियाच्या राजधानीतून झरीफ यांचे शनिवारी आगमन झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. इराणचे संरक्षणमंत्री मोहंमद झरीफ, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि युरोपीय संघटनेच्या प्रमुख फेडेरिक मोगेरेनी बैठकीत सहभागी होतील. त्यावर शिक्कामोर्तब ही आैपचारिकता आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव वाढवला नव्हता. त्यानंतरही आता निकाल आमच्या बाजूने लागला आहे. याचा अर्थ आमच्यावरील आरोप बिनबुडाचे होते, हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच हा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे झरीफ म्हणाले. गेल्या वर्षी १४ जुलै रोजी इराणने समझोता केला होता. एका वर्षात इराणने त्यानुसार आपल्या अणू कार्यक्रमात किती घट केली किंवा त्याची किती अंमलबजावणी झाली आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे. इराणने अण्वस्त्र असल्याचा दावा वारंवार फेटाळून लावला आहे. आमचा आण्विक वापर हा केवळ शांततामय मार्गासाठी आहे. त्याचा उपयोग ऊर्जा आणि आैषधीच्या क्षेत्रात केला जातो, असे इराणने म्हटले होते. त्यावर पाश्चात्त्य जगाकडून दुर्लक्ष करण्यात आले होते.