आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी वर्षात तिसरा खटला हरली, कॅन्सर पीडित महिलेस मिळेल कोटीची भरपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- बहुराष्ट्रीय कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन या वर्षी नुकसान भरपाईशी संबंधित तिसरा खटला हरली आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने गुरुवारी कंपनीस एका महिलेस ४६८ कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश बजावले. या कंपनीचे उत्पादन वापरल्यामुळे कॅन्सर झाल्याचा दावा महिलेने केला होता.

अमेरिकी कंपनी या वर्षी फेब्रुवारी ४८० कोटी आणि मे महिन्यात ३६७ कोटी रुपये भरपाईचा खटला हरली आहे. म्हण्जे आठ महिन्यांत एकूण १३१५ कोटी रुपयांचे कंपनीचे नुकसान झाले. अमेरिकेत गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त ४००० महिलांनी कंपनीवर खटला गुदरला आहे.
६२ वर्षीय देबोराह गियानेचिनीने सेंट लुईसच्या न्यायालयात सांगितले की, मी ४० वर्षांपासून जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोन टॉल्कम पावडर वापरत होते. २०१२ मध्ये मला गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना गर्भाशयात टॉल्कम पावडरचे अंश सापडले. कंपनी या दोन्ही पावडरची मार्केटिंग ‘हायजीन प्रोडक्ट’म्हणून करते. महिलेचे वकील जिम ओंडेर म्हणाले, कंपनीचे दस्तऐवज पाहता टॉल्कम पावडरमुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते हे कंपनीला १९७० च्या दशकापासूनच माहीत होते. मात्र, कॅन्सरच्या धोक्याचा इशारा दिला नाही. त्यांनी ही वस्तुस्थिती लपवली. ओन्डेर म्हणाले, आपल्या आजारास एक उत्पादन कारणीभूत आहे हे जगाला सांगण्याचा देबोराह यांचा प्रयत्न आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रवक्त्या कॅरोल गुडरिच यांनी देबोराह यांचा दावा चुकीचा ठरवला. या पावडरवर ३० वर्षे संशोधन केले. त्यात ते सुरक्षित आढळले. कंपनी या निकालाविरुद्ध अपील करेल, असे त्यांनी सांगितले.कंपनीने याआधीच हरलेल्या दोन प्रकरणांत आव्हान दिले आहे. जॉन्सनची उत्पादने १७५ देशांत विक्री होतात. यातून ४.६५ लाख कोटी रुपये महसूल जमा होऊन नफा १.०२ लाख कोटी रु. झाला आहे.
वर्षभरात त्याचे शेयर्स १४ टक्क्यांनी वाढले. भारतात बेबी पावडरच्या बाजारपेठेतील ५० टक्के वाटा याच कंपनीकडे आहे. फोर्ब्स २०१५ च्या यादीत “जॉन्सन फॅमिली’ जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत ४६ व्या क्रमांकावर होती.

कंपनीविरुद्ध ४००० अशाच प्रकारचे खटले
उत्पादनावर इशारा आवश्यक : जज
जज बिली यांनी सांगितले, कंपनीला ग्राहकांची काहीच काळजी नसल्याचे जाणवते. उत्पादन घ्यावे की नाही हे समजण्यासाठी त्यांनी भविष्यात उत्पादन इशाऱ्यासह बाजारात आणावे.

२०% जगण्याची आशा
कॅलिफोर्नियाच्या देबोराह यांनी खटला जिंकला. मात्र, त्या आजारपणातून बाहेर पडणे अवघड आहे. त्या दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस जगण्याची शक्यता २० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...