आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलेप्पोला बंडखोरमुक्त करण्यासाठी संयुक्त मोहीम, रशिया-सिरियाने सर्वंकष नीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो - अलेप्पोमधील बंडखोरांच्या नियंत्रणात असलेल्या परिसरात सिरियन फौजा व रशियाने जाेरदार हवाई हल्ले केले. अलेप्पोच्या पूर्व भागात जोरदार बॉम्बवर्षाव झाल्याचे एका वाहिनीच्या प्रतिनिधीने सांगितले. जमिनीवरूनही सिरियन फौजांनी जोरदार हल्ला केल्याचे यात म्हटले आहे. अलेप्पोमधील बंडखोरांच्या नियंत्रणातील भूप्रदेश ताब्यात घेणार असल्याचे गुरुवारी रात्रीच सिरियन लष्कराने जाहीर केले होते. अलेप्पोमध्ये यानंतर कोम्बिंग ऑपरेशन करून बंडखोरांना हुसकावले जाणार असल्याचेही सिरियन लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. बंडखोरांच्या शस्त्रसाठ्यांना लष्कर ताब्यात घेणार आहे.

सिरियन मानवाधिकार विभागाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या दोन दिवसांत बंडखोरांच्या ठिकाणांवर ३० हवाई हल्ले झाले. ब्रिटनच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तात यात १० जणांचा बळी गेला. मृतांत २ बालकांचा समावेश आहे. अनेक जण ढिगाऱ्यांखाली गाडले गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले असून या वर्षभरात झालेला हा मोठा हल्ला आहे. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सिरियन फौजा इमारती रिकाम्या करत आहेत.

रशियाचा सिरियन फौजांना पूर्ण पाठिंबा
नागरी सुरक्षा विभागाच्या २ इमारती यात पडल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. मानवाधिकार विभागप्रमुख रमी अब्देल रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने सिरियाच्या फौजांना या हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पुरवला आहे. अलेप्पोच्या पूर्वेकडून रशियन फौजा एक-एक इमारत रिकामी करत असून नागरिकांना हलवण्यात येत आहे, असे रमी यांनी सांगितले. बंडखोरांना अलेप्पोतून हुसकावून लावण्यासाठी रशिया-सिरियाने नियोजित मोहीम आखली आहे.
बातम्या आणखी आहेत...