आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉर्डनने 15 जणांना दिली फाशीची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमान - मानवी हक्क संघटनांचा कितीही आक्षेप असला तरी जॉर्डनने शनिवारी १५ जणांना फासावर चढवले. शनिवारी शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व जॉर्डनचे आहेत. मृत्युदंड झालेल्यांमध्ये दहा दहशतवादी आहेत. २००६ ते २०१४ दरम्यान दहशतवादी कारवायांत हात असल्याच्या घटनांत दोषी असलेल्या १० जणांना फाशीची शिक्षा झाली होती. शिक्षेची अंमलबजावणी शनिवारी पहाटे करण्यात आली. 

अत्याचार, हत्या इत्यादी पाच प्रकारच्या गुन्ह्यांतील पाच दोषींनाही मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. २००६ मध्ये झालेल्या हल्ल्यात एका ब्रिटनच्या नागरिकाचा मृत्यू झाला. जून २०१६ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०१६ मध्ये ख्रिश्चन लेखक नाहिद हटर यांची हत्या झाली होती. त्या प्रकरणात काही दोषी ठरले.   जॉर्डनला मध्यपूर्वेतील मृत्युदंडमुक्त असलेला देश करायचे आहे, असे किंग अब्दुल्लांनी २००५ मध्ये म्हटले होते. परंतु २०१४ मध्ये जॉर्डनच्या न्यायालयाने ११ जणांना मृत्युदंड दिला होता.
 
बातम्या आणखी आहेत...