आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 कोटींची संपत्ती अन् सेक्शुअल असॉल्टची केस, अशी आहे या हॉट योगगुरुची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिक्रम चौधरी आणि त्याची माजी लीगल अॅडवायजर मीनाक्षी.... - Divya Marathi
बिक्रम चौधरी आणि त्याची माजी लीगल अॅडवायजर मीनाक्षी....
इंटरनॅशनल डेस्क- जगभरात हॉट योगा सेंटर चेन चालवणारा योगगुरु बिक्रम चौधरी पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. आपल्या सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात अरेस्ट वारंट जारी करण्यात आले आहे. बिक्रमने कोर्टाच्या आदेशानुसार, समोरच्या पार्टीला ४५ कोटी रूपये न दिल्याने त्याच्याविरोधात हे वारंट काढण्यात आले आहे. सन 2013 मध्ये त्याची वकिल मीनाक्षीसह सहा महिलांनी योग गुरु बिक्रमवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्यावर तेथे केस सुरु आहे. मात्र, काही महिन्यापूर्वी कोर्टाने त्याच्या विरोधात निकाल देताच तो फरार झाला होता. बिक्रम आताही बिक्रम योगा स्टूडियोजच्या 700 हून अधिक फ्रॅंचायजीचा मालक आहे. त्याची एकून संपत्ती सुमारे 500 कोटीहून अधिक आहे. अटक झाली तर बेलसाठी लागतील 51 कोटी रूपये...
 
- अमेरिकेतील अथॉरिटीजचे म्हणणे आहे की, बिक्रमने आपली संपत्ती लपविण्यासोबतच देश सोडून फरार झाला आहे. मात्र, आता हे स्पष्ट होऊ शकले नाही सध्या तो नेमका कुठे आहे. 
- एबीसी न्यूजच्या रिपोर्टच्या माहितीनुसार, अमेरिकेत येताच ब्रिकमला अटक केली जाईल. तसेच मेक्सिको येथे सापडल्यास त्याला तत्काळ अटक केली जाईल. 
- कोर्टाने बिक्रमला जामीन हवा असल्यास 51 कोटी रूपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. 
 
सहकारी वकील महिलेचे लैंगिक शोषण-

- विक्रम चौधरीवर त्याची वकील मीनाक्षी जाफा बोडेन हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी कोर्टाने बिक्रम चौधरीला दोषी ठरवले होते. 
- 2013 मध्ये मीनाक्षीसह सहा महिलांनी विक्रम चौधरीवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. कॅनडामधील जिल लॉवलरने पहिल्यांदा चौधरीवर बलात्काराचा आरोप केला होता.
- हॉट योगगुरु बिक्रम चौधरीला आपल्या महिला वकीलाला भरपाई म्हणून सहा कोटी रुपये (नऊ लाख डॉलर्स) देण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर बिक्रम अमेरिकेतून फरार झाला होता. 
- बिक्रम चौधरीने वकील मीनाक्षीचे अनेकदा लैंगिक शोषण केले. तिचा विनयभंगही केला. तिला हॉटेलच्या सुईटमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला. हॉट योगगुरुवरील जुन्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर मीनाक्ष‍ी बाजू मांडत होती.
- मीनाक्षीने हॉट योगगुरुवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर तिची जून 2013 मध्ये नोकरीवरून हकालपट्टी करण्‍यात आली होती. 
- या प्रकरणी कोर्टाने योगगुरु विक्रम चौधरीला दोषी ठरवत त्याला पीडितेला सहा कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश‍ दिले होते.
 
कायम वादात राहिलाय ब्रिकम चौधरी-
 
- 70 वर्षीय भारतीय अमेरिकन बिक्रम चौधरी 'बिक्रम योग'चा संस्थापक आहे. तो संपूर्ण जगात हॉट योग गुरु नावाने प्रसिद्ध आहे.
- 220 देशात त्याचे 720 योग सेंटर आहे, जेथे बिक्रम योगा शिकवला जातो. एकट्या ब्रिटनमध्ये अनेक सेंटर आहेत. 
- त्याच्या फॉलोअर्समध्ये मॅडोना, डेमी मूर, बिल क्लिंटनची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि जॉर्ज क्लूनी यासारखे अनेक हॉलिवूड, खेळ आणि पॉलिटिक्सच्या जगतातील हाय प्रोफाईल सेलिब्रिटीज सहभागी आहेत.
- बिक्रमवर सेक्शुअल हॅरेसमेंटचे आरोप नेहमीच होत आले आहेत.
- सन 2013 मध्ये त्याची वकिल मीनाक्षीसह सहा महिलांनी योग गुरु बिक्रमवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप केला होता. 
- तर, बिक्रमने एका इंटरव्यूमध्ये म्हटले होते की, त्याच महिला माझ्यावर प्रेम करतात. मी कोणावरही कधीही बळजबरी केली नाही.
 
पत्नीने दिलाय घटस्फोट-
 
- त्याची पत्नी राजश्री सुद्धा फेमस योगा टीचर आहे, जिने बिक्रमवर रेपचे आरोप झाल्यानंतर वैतागून घटस्फोटासाठी अर्ज केला. 
- 32 वर्षाच्या लग्नानंतर राजश्री चौधरीने डिसेंबर 2015 मध्ये बिक्रम चौधरीविरूद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
- राजश्रीने बिक्रमच्या 500 कोटीच्या प्रॉपर्टीतील आपला निम्मा हिस्सा मागितला होता.
- अखेर एप्रिल 2015 मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. राजश्रीला पोटगी म्हणून बेवरली हिल्स आणि लॉस एंजिलिसचे घर सोबतच फेरारी, मर्सिडीज 550 आणि बेन्टले कार दिल्या गेल्याचे सांगितले गेले. 
- तसेच यानंतर राजश्री बिक्रम चौधरीवर कोणताही खटला दाखल करणार नाही, अशी त्यांच्यात तडजोड झाली.
- बिक्रम आणि राजश्री यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. 
- बिक्रमजवळ 720 पेक्षा अधिक योगा स्कूलसोबतच बेवरली हिल्स, लॉस एंजिलिस आणि होनोलुलूमध्ये प्रॉपर्टीज आहेत.
- यासोबतच त्याच्याकडे 43 लग्झरी कार्सचा अलिशान ताफा आहे, ज्यात रॉल्स रॉयस आणि बेन्टले सारख्या कार्स आहेत.
- सध्या, बिक्रम अमेरिका सोडून भारतात परतला असून त्याने लोणावळ्यात आपले बस्तान बसवल्याचे बोलले जाते.
 
काय आहे बिक्रम योग?
 
- बिक्रम चौधरी आपल्या फॉलोअर्सना 40 डिग्री सेल्सियस तापमानात योगा शिकवतात. तो याला 'हॉट योग' म्हणतो.
- त्याच्याजवळ वर्ल्डवाईड 650 स्टूडियोत हजारों फॉलोअर्स आहेत. 
- फोर्ब्सच्या माहितीनुसार, बिक्रम एका ट्रेनिंग सेशनला 10 हजार डॉलर तर पर्सनल ट्रेनिंगसाठी 20 हजार डॉलर घेतो.
- बिक्रम ऑक्टोबर 2015 मध्ये कॉपीराईट केस हारला होता. यात 26 पोज आणि तीन ब्रीथ एक्सरसाईजचा समावेश होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...