आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-मेल प्रकरणी हिलरींच्या मागे आता कोर्टाचा भुंगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यामागे कोर्टकज्जे सुरू झाले आहेत. इ-मेल प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी खासगी सर्व्हरचा वापर का केला, याचे लेखी उत्तर देण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे हिलरींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

परराष्ट्र मंत्री पदावर असताना इ-मेल पाठवणे किंवा मागवण्यासाठी खासगी सर्व्हरचा वापर का करण्यात आला, अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली आहे. हिलरी अगोदरच अनेक कारणांमुळे त्रस्त आहेत. सहा आठवड्यापूर्वीच त्यांना एफबीआयचे संचालक जेम्स बी. कोमी यांनी इ-मेल प्रकरणी क्लीन चीट दिली होती. हिलरी यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे खटला दाखल किंवा चालवण्याची गरज नाही. ती केवळ बेपर्वाई होती, असे कोमी यांनी म्हटले होते. शनिवारी हा न्यायालयाने त्या बाबतचा आदेश जारी केला आहे.
कॉन्झर्व्हेटिव्ह अॅडव्होकसी संबंधी संघटना ज्युडिशियल वॉचने याबाबतची याचिका दाखल केली होती. ही संघटना हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात इ-मेल प्रकरणाचा आपल्या व्यापक आंदोलनासाठी वापर करून घेत आहे. इ-मेल मुद्दा चर्चिला जाऊ नये, असा इशारा देणाऱ्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे.अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने याच आठवड्यात काँग्रेसमध्ये (संसद) काही दस्ताऐवज व हिलरी क्लिंटन यांची साडेतीन तासांची मुलाखत सादर केली होती. पदाची शपथ घेतल्यानंतरही हा सगळा खोटारडेपणा आहे, अशी टीका रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यांनी केली आहे. अगोदरच ट्रम्प यांनी हिलरींवर टीकेचे आसूड आेढले आहेत. त्यात कोर्टकचेरीमुळे हिलरींची पुरती दमछाक होऊ शकते.

हिलरींच्या मागे ज्युडिशियल वॉच
ज्युडिशियल वॉचने हिलरींच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळेच त्यांच्या मागे कोर्टकज्जे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. परराष्ट्र विभागाकडून मोठी माहिती मिळवण्यात आल्याचे फ्रीडम ऑफ इन्फर्मेशनने म्हटले.

१९९० पासून हिलरींना होताेय विरोध
ही संघटना १९९० दशकापासून हिलरी क्लिंटन यांच्या पाठीमागे लागली आहे. हिलरी यांच्यासाठी ही कायदेशीर लढाई अाहे. परंतु त्यामुळे हिलरींच्या मोहिमेचे नुकसान होता कामा नये. - ब्रॉयन फॅलन, प्रवक्ता, हिलरी क्लिंटन.

हिलरींना मिळेल ३० दिवसांची मुभा
हिलरी क्लिंटन यांना विचारण्यात येणारे प्रश्न १४ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी ज्युडिशियल वॉच संघटनेला दिले आहेत. त्याचाच अर्थ हिलरी यांना उत्तर देण्यासाठी ३० दिवसांचा अवधी मिळणार आहे. निवडणूक झाल्यानंतरही त्या उत्तर देऊ शकतील. परंतु परराष्ट्र मंत्री असताना त्यांचे सहाय्यक राहिलेले जॉन बेंटले यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत जबाब द्यावा लागणार आहे. बेंटले निवृत्त झाले आहेत. हिलरी खासगी सर्व्हरने माहिती पाठवत असल्याची कल्पना बेंटले यांना होती. त्यामुळे ते जबाबात काय सांगतात, हे देखील तितकेच महत्वाचे ठरेल.
बातम्या आणखी आहेत...