आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबुल संसद-विद्यापीठ परिसर दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरला; 24 ठार, 45 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबुल- अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहरात अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी सायंकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवून आणले. स्फोटात 24 जणांचा मृत्यु झाला असून 45 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या सादिया सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांची आणि खासदारांचे कार्यालये हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते. अमेरिकन विद्यापीठाच्या केंद्राजवळ हे ब्लास्ट झाले आहेत.  

कसे झाले स्फोट? 
- सिद्दीकींनी सांगितले की, पहिला ब्लास्ट एका सुसाइड बॉम्बरने घडवून आणला. त्यानंतर काही क्षणात‍च दुसरा ब्लास्ट झाला.  
- दुसऱ्या ब्लास्टसाठी हल्लेखोरांनी कार बॉम्बचा वापर केला आहे.
तालिबानी नेता जबीउल्लाह मुजाहिदने स्विकारली हल्ल्याची जबाबदारी... 
- दहशतवादी संघटना तालिबानचा नेता जबीउल्लाह मुजाहिद याने एका न्युज एजन्सीला फोन करुन काबूलमधील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. 
- स्फोटात जखमी झालेल्या काहीची प्रकृती‍ चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती गृहमंत्रालयाने आहे.  
- परंतु, 'अलजजिरा' या वृत्तवाहिनीने हेल्थ आधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले आहे की, या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यु झाला आहे आणि 45 लोक जखमी आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
- वृत्तानुसार, हल्ल्यात मृत्यु झालेल्यांमध्ये सिक्युरिटी स्टाफ ची संख्या अधिक आहे.
 
हेलमंडमध्येही हल्ला
- या आधीही, मंगळवारी सकाळी हेलमंड राज्यात तालिबानने हल्ला केला  होता. यात सात जणांचा मृत्यू झाला होता
- अफगाणिस्तानच्या आर्मी जनरल अधिकाऱ्याने सांगितले आहे की, दहशदवाद्यांच्या निशाण्यावर सरकारी आधिकाऱ्यांचे एक गेस्ट हाऊस होते. परंतु, या हल्ल्यात मृत्यु झालेल्यामध्ये नागरिकांची संख्या जास्त आहे. 
- तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ल्याची स्ट्रॅटजी बदलली आहे. आता तेथे रस्त्यांवर आयडी लावून ब्लास्ट करण्यात येत आहे. मागच्या आठवड्यात अशाच एका स्फोटात अफगानिस्तान आर्मीच्या तीन जवानांचा मृत्यु झाला होता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)