आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैरी पिता-पुत्र एकत्र; दहशतीविरुद्ध आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - ही कहाणी एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी वाटेल. मात्र, हे वास्तव आहे. कधीकाळी एकमेकांच्या जिवावर उठलेल्या एका वडील आणि मुलाची कथा आहे. अनेक वर्षंाच्या संघर्षात कथेला अचानक नाट्यमय वळण मिळाले. मुलाने दहशवादाची वाट सोडत वडिलांच्या पावलावर पाऊल टाण्याचा निर्णय घेतला. आता दोघे मिळून अतिरेक्यांवर निशाणा साधत आहेत.

गेल्या रविवारी उत्तर अफगाणिस्तानमधील एका घरात दोघे शत्रू एक झाले. मुलगा तालिबानची साथ सोडत वडिलांच्या छत्रछायेखाली आला. या संस्मरणीय क्षण साजरा करण्यात आला. दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले ना घातले तोच तालिबानने हल्ला चढवला. वडील अब्दुल बशीरने शस्त्र उचलून तालिबानवर हल्ला चढवला. मुलगा सईद मोहंमदने तालिबान कमांडरविरुद्ध गोळ्या चालवल्या. यासंदर्भात वडील बशीर म्हणाले, तो माझा मुलगा होता. मात्र, डरपोक होऊन माझ्यावर वार करू लागला होता. आता तो माझ्याकडे परतल्याने मी आनंदी आहे. मी त्याची गळाभेट घेऊन स्वीकार केला आहे.

१९९० च्या दशकात बशीर, अब्दुल रशीद लष्करात कमांडर होते. फरयाब राज्यात एक स्थानिक मौलवी सय्यद तालिबानचा कमांडर होता. बसीर आणि मौलवी एकमेकांच्याविरुद्ध अनेक वर्षे लढत राहिले.

यानंतर २००१ मध्ये अमेरिकी लष्कर अफगाणिस्तानात आले आणि बशीरची ताकद वाढली. मनात घेतले असते तर तो बशीरला ठार करू शकत होता. मात्र, तालिबानची साथ सोडण्याच्या अटीवर त्याला सोडले. त्यांनी मौलवीची मदत केली. मौलवीने तालिबानशी संबंध तोडण्याचे वचन दिले होते. मात्र, तो गुपचूप संधान साधून होता. गेल्या काही वर्षांत तालिबान पुन्हा सक्रिय झाल्यानंतर बशीरचा सूड उगवण्यासाठी त्याने मुलगा सईदला तालिबानमध्ये भरती केले. सईदला चिथावणी दिल्यानंतर तो वडिलांची रायफल घेऊन तालिबानच्या तंबूत सामील झाला. मौलवीने वडिलांना अमेरिकेचे एजंट ठरवले होते. त्यामुळे तुला जिहादमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे सांगून सईदचे मौलवीने डोके भडकावले होते. तीन वर्षांपूर्वी वडिलांची हत्या करण्यासाठी सईद संधी शोधत होता.

एके दिवशी तशा प्रयत्नात असताना तो पकडला गेला. बशीर म्हणाले, त्याच दिवशी त्याला ठार करणार होतो, पण नातेवाइकांनी त्याला वाचवले. लष्करात सहभागी होण्यासाठी त्याचे मन वळवले आणि अखेर तो त्यासाठी तयार झाला. त्याला पकिटा प्रांतात ड्यूटीवर पाठवले. मात्र, तरीही तो तालिबानच्या संपर्कात राहिला. त्याला दरमहा तालिबानकडून २०२ डॉलर वेतन दिले जात होते. यादरम्यान मौलवीने पुन्हा सईदला फितूर केले. परिणामी तो पुन्हा तालिबानला जाऊन मिळाला. यानंतर त्यांनी मुलास पुन्हा ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. अखेर गेल्या मे महिन्यात तालिबानची वस्तुस्थिती समजावून सांगण्यात त्यांना यश मिळाले. पिता-पुत्राच्या या मनोमिलनानंतर आता मुलगा वडिलांच्या लढ्यात साथ देत आहे.
(न्यूयॉर्क टाइम्सशी विशेष कराराअंतर्गत)
बातम्या आणखी आहेत...