आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 फूट उंच सुळक्यावरून काेलांटउडी, चूकही ठरली असती जीवघेणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आेस्लो । १२०० फूट उंचीवरून उडी. एवढ्या उंचीवरून उडी घेण्याच्या विचाराने काही लोक काढता पाय घेतील.परंतु नॉर्वेच्या १८ वर्षांच्या ब्रेग हर्नेस गॅसवर याने ही जिगरबाजी सहजपणे दाखवली.
एवढचे नव्हे तर ती काेलांटउडी होती. थोरला भाऊ जार्लने धाकट्याचा थरार कॅमेऱ्यात चित्रित केला. आम्ही दोघे भाऊ एका मित्रासोबत श्वॉलजर शहराजवळील श्वॉल्जरगेइटा नावाच्या सुळक्यावर पोहोचलाे. काहीतरी स्टंटबाजी करण्याची इच्छा होती.
आतापर्यंत कोणीही केले नसेल, असे काही करण्याची इच्छा होती. जार्लला उडी मारू का, असे विचारले. तू कोणालाही जमणार नाही, अशी कामगिरी करू शकतोस, असे जार्ल म्हणाला. त्यानंतर मी एवढ्या उंचीवरून आजूबाजूला पाहिले. सुळक्यांतील अंतर लक्षात घेतले .
३५० मीटर खाली स्मशानभूमी होती. आधी उडी मारण्याची योजना होती. परंतु शिखरावर पोहोचल्यानंतर फार काही विचार न करता तीनपर्यंत उलटगणती सुरू केली आणि जवळपास ६ फूट अंतरावर उलटी उडी घेतली, असा अनुभव हर्नेसने सांगितला.
बातम्या आणखी आहेत...