आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला अमेरिकेने दिला दणका, ‘काश्मीर’ भारत-पाकचा अंतर्गत प्रश्न : ओबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क; काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नव्याने मांडू पाहणाऱ्या पाकला अमेरिकेने जोरदार दणका दिला. काश्मीर हा या दोन्ही देशांतील अंतर्गत प्रश्न असल्याचे अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मान्य केले.

हा प्रश्न भारत-पाकिस्तान या दोघांनी आपसांत चर्चेच्या माध्यमातूनच सोडवावा, असेही ओबामा यांनी स्पष्ट केले. यात तिसऱ्या पक्षाची गरज नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना देत असलेले बळ हा मुद्दाही दोघांच्या चर्चेत महत्त्वाचा होता.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, काश्मीर प्रश्न भारत-पाकचा अंतर्गत प्रश्न असल्याबाबत मोदी-ओबामा यांच्यात एकमत होते. या दोन्ही देशांनी मिळून यावर काही सर्वमान्य तोडगा काढला तर लोकांनाही तो मान्य असेल, अशी भूमिकाही ओबामांनी मांडली. मोदींची ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून व फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांच्याशी झालेल्या भेटीचाही स्वरूप यांनी उल्लेख केला.

ते म्हणाले, या बैठकांत दहशतवाद व पाकिस्तान यावर चर्चा झाली. दहशतवादाशी सर्वांनी मिळून लढले पाहिजे, यावर या देशांच्या नेत्यांचे एकमत होते. दहशतवादास चांगला किंवा वाईट ठरवले जाऊ शकत नाही, यावरही या नेत्यांचे एकमत होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा ओबामा काय म्हणाले...