आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashmir Is Issue Between India And Pakistan Only

मोदींच्या भेटीत ओबामा म्हणाले, काश्मीर हा भारत-पाकिस्तानदरम्यानचा मुद्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी रात्री चर्चेपूर्वी गळाभेट गेताना ओबामा आणि मोदी. - Divya Marathi
सोमवारी रात्री चर्चेपूर्वी गळाभेट गेताना ओबामा आणि मोदी.
न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा काश्मीर मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा मुद्दा असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. सोमवार रात्री उशीरा झालेल्या बैठकीत ओबामांनी हे स्पष्ट केले. दोन्ही देशांनी मिळून हा मुद्दा सोडवायला हवा असेही मोदी म्हणाले. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याच्या मुद्यावरही मोदी आणि ओबामा यांच्यात चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली.
(मोदी अमेरिकेत स्टार बनले पण शरीफ काय करतायत?, वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

मोदी-ओबामा यांच्यात झालेली चर्चा
मोदी आणि ओबामा यांच्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना स्वरुप म्हणाले की, “दोन्ही नेत्यांचे या मुद्यावर एकमत झाले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे मुद्दे आपसांत चर्चा करून सोडवायला हवे. स्वरूप यांनी मोदींच्या ब्रिटिश पंतप्र्रधान पीएम डेव्हीड कॅमेरून आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रँकोइस होलांद यांच्याशी झालेल्या भेटीबाबतही माहिती दिली. या चर्चेत दहशतवाद आणि पाकिस्तानबाबत चर्चा झाली. त्या चर्चेचे केंद्र हे दहशतवादाविरोधात सर्वांना एकत्रितपणे लढावे लागेल असे होते. दहशतवाद चांगला किंवा वाईट असे ठरवता येणार नाही, असे त्यात ठरले.

यूएन क्यों तय नहीं कर पा रहा है टेरेरिज्म की डेफिनेशन
जेव्हा स्वरुप यांना मीडियाने विचारले की, यूएनला दहशतवादाची व्याख्या का ठरवता येत नाही. तेव्हा स्वरुप म्हणाले, काही देश आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन म्हणजे यानी ओआयसीच्या मते या व्याख्येत फ्रीडम फायटर्सचा समावेश करायला हवा. पण इतर देश त्यासाठी तयार नाहीत. काही प्रपोजल आले पण त्यावर अद्याप सहमत झालेले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या 70 व्या वर्धापन दिनाला यावर काही निर्णय होइल अशी भारताला आशा आहे.

ISIS बाबत काय म्हणाले स्वरुप..
दहशतवादी संघटना ISIS बाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्वरुप म्हणाले की, एखाद्या विशिष्ट संघटनेबाबत चर्चा झाली नाही. पण पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, दहशतवादाचा सामना सर्वांना मिळूनच करावा लागेल.

अमेरिकेकडून हेलिकॉप्टर्स खरेदी करणार भारत
भारतीय संरक्षम मंत्रालयाने अमेरिकेकडून 15 चिनूक हेवीवेट हेलिकॉप्टर्स , 22 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा एक करार सोमवारी झाला. माहितीनुसार भारताला या करारानुसार पहिले हेलिकॉप्टर आगामी तीन ते चार वर्षांमध्ये मिळेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदी आणि ओबामांच्या भेटीचे PHOTOS