आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटीरवाद्यांच्या बंदमुळे जनजीवन विस्कळीतच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे काश्मीरमधील सामान्य जनजीवन मंगळवारीही विस्कळीत होते. खोऱ्यातील बहुतांश दुकाने तसेच वाहतूक बंद होती. मात्र, श्रीनगरच्या बाह्य भागात काही कार आणि मिनी बसेस रस्त्यावर फिरताना दिसल्या. या भागातील काही दुकानेही उघडी होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोऱ्यातील बहुतांश मुख्यालयांच्या ठिकाणी बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी वाहतूकही सुरू होती. मात्र, लोकांची ये-जा थंडावली होती. गेल्या आठवड्यातील दोन दिवस वगळता काश्मीरमध्ये गेल्या १३७ दिवसांपासून बंद पाळण्यात आला. हिजबुलचा कमांडर बुरहान वानी ८ जुलैला चकमकीत ठार झाल्यापासून फुटीरवाद्यांनी बंद पुकारला आहे.
पाकिस्तानी घुसखोर गोळीबारात ठार : जम्मू जिल्ह्यातील आर. एस. पुरा भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी घुसखोर ठार झाला. पाकिस्तानच्या एका संशयित व्यक्तीने सीमा पार केली आणि दाट धुक्याचा फायदा घेऊन पोहोचला.
बातम्या आणखी आहेत...