आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कश्यपची 63 मिनिटांत अव्वल मानांकित ह्युनवर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनाहेइम (अमेरिका)- राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यपने गुरुवारी अमेरिकन अाेपन ग्रांप्री गाेल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला सनसनाटी विजय संपादन केला. त्याने पहिल्या सामन्यात अवघ्या ६३ मिनिटांत अव्वल मानांकित ली ह्युन इलला हरवले. दुसरीकडे दुखापतीतून सावरलेल्या समीर वर्मा, दुसरा मानांकित एच. एस. प्रणय अाणि ऋतुपर्णा दासने विजयी सलामी देऊन अापापल्या गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. समीर वर्माने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात व्हिएतनामच्या हुअांग नाम नगुएनचा पराभव केला. त्याने २१-५, २१-१० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. त्यापाठाेपाठ दुसऱ्या मानांकित एच. एस. प्रणयने  सलामीला अाॅस्ट्रियाच्या लुका रैबरचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला.   

कश्यप दुसऱ्या फेरीत 
भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत अवघ्या ६३ मिनिटांत शानदार विजयी सलामी दिली. त्याने सलामी सामन्यात  जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या ली ह्युन इलचा पराभव केला. त्याने एक तास ३ मिनिटे रंगलेली लढत २१-१६, १०-२१, २१-१९ अशा फरकाने जिंकली.

मनू अत्री-सुमीत दुसऱ्या फेरीत
भारताच्या मनू अत्री अाणि सुमीत रेड्डीने पुरुष दुहेरीतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. या जाेडीने सलामी सामन्यात कॅनडाच्या जैसन अॅथाेनी-नील याकुराचा पराभव केला. त्यांनी २१-१५, २१-१९ अशा फरकाने सरळ दाेन गेममध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. यामुळे या जाेडीने सहज दुसरी फेरी गाठली.

>मेघना व पुर्विषाने महिला दुहेरीत विजयी सलामी दिली. त्यांनी पहिल्या फेरीत जपानच्या रिका कवाशिमा-साअाेरी अाेजाकीला २१-१६, १४-२१, २१-१४ ने पराभूत केले.  
> मनू अाणि मनीषाने मिश्र दुहेरीचा पहिल्या फेरीतील सामना जिंकला. त्यांनी नील याकुरा व ब्रिटिनीवर मात केली. त्यांनी २१-१३, २१-१५ ने विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...