आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ROYAL BABY: ब्रिटिश राजघराण्यात कन्यारत्न, केटने दिला गोंडस मुलीला जन्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- प्रिन्स विल्यम आणि पत्नी केट मिडलटन पहिला मुलगा जॉर्जसोबत.)
लंडन- ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स विल्यम याची पत्नी केट मिडलटनने आज (शनिवार) मुलीला जन्म दिला. राजघराण्याने याची अधिकृत घोषणा केली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून 34 मिनिटांनी राजघराण्यात नवीन सदस्य आला. राजमुकूटासाठीच्या क्रमवारीत ही मुलगी चौथ्या क्रमांकावर राहिल.
यापूर्वी डचेस ऑफ केंब्रिजला (केट मिडलटनला दिलेली शाही पदवी.) आज सकाळी पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज झालेली मुलगी केट आणि विल्यमची दुसरी मुलगी आहे. यापूर्वी जुलै 2013 मध्ये केटने मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव जॉर्ज ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे आज पहिल्यांदाच केट आई झाल्याचे वृत्त अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी बकिंघम पॅलेसने प्रेस ब्रिफिंगमध्ये मीडियाला सांगितले होते, की राजघराण्यात नवीन सदस्य येणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, राजघराण्यात नवीन सदस्य आल्याने ब्रिटनमध्ये आहे आनंदाचे वातावरण.... अशी दिली जनतेला माहिती...