आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kazakh President Nursultan Nazarbayev Has Had A Widely Expected Crushing Election

कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष पाचव्यांदा जिंकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अष्टाना - कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नूरसुलतान नजरबायेव्ह यांनी सोमवारी सलग पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. जवळपास ९५.११ टक्के मतदानात त्यांना ९७.७ टक्के मते मिळाली. ते १९८९ पासून कझाक प्रजासत्ताक देशाचे नेते आहेत. १९९१ मध्ये सोव्हिएत संघातून बाहेर पडल्यापासून ते राष्ट्राध्यक्ष आहेत.

निकाल जाहीर झाल्यानंतर नजरबायेव्ह म्हणाले, सुपर डेमोक्रॅटिक देशात हा आकडा स्वीकारार्ह ठरू शकत नाही. त्यामुळे मी माफी मागू इच्छितो. मात्र, मी काहीही करू शकत नाही. मी त्यात हस्तक्षेप केल्यास ते लोकशाहीविरोधी ठरेल. देश एवढा मोठा आहे की त्याची सीमा रशिया आणि चीन दोघांना लागून आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी नजरबायेव्ह यांचे अभिनंदन केले आहे.
नजरबायेव्ह यांनी एक वर्षाआधीच मुदतपूर्व निवडणूक घेतली. त्यांनी प्रचारादरम्यान आपल्या तेलसमृद्ध मध्य आशियाई देशात आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचे आश्वासन दिले होते. लोकांनी सामाजिक जबाबदारीतून मतदान केल्याचे मानले जाते. साधारणत:
देशातील सर्व वृत्तपत्रांवर सरकारी नियंत्रण आहे.

देशाचा नेता, कायद्यानुसार त्यांना हवी तेवढी इच्छा पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असा या वृत्तपत्रांच्या मथळ्यांचा आशय होता. वास्तवात त्यांचे सर्व विरोधक एक तर तुरुंगात आहेत किंवा देश सोडून गेले आहेत.