तत्पूर्वी गुरुत्वीय लहरी अर्थात ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावणाऱ्या संशोधकांना या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. रेइनर वेइसिस, बॅरी सी बॅरिश आणि किप एस थॉर्न या तिघांनी गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. गुरुत्वीय लहरींवर महान शास्त्रज्ञ अॅल्बर्ट आइंस्टाइन यांनी सिद्धांत मांडला होता. तोच सिद्धांत या तिघांनी शोध लावून साकारला आहे. या तिघांनी दोन वर्षांपूर्वी शोध लावताच जगभरात खळबळ उडाली होती.
यासोबत, सोमवारी सर्वांत प्रथम वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलची घोषणा स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल अमेरिकी शास्त्रज्ञ जेफ्रे सी. हॉल, मायकेल रोसबाश व मायकेल डब्ल्यू यंग यांना जाहीर झाला.