आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावात पुरुषांवर आहे बंदी, 25 वर्षांपासून येथे फक्त महिला राहतायतं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केनियाच्या समबुरु कौंटीतील उमोजा गावात फक्त महिला राहतात. - Divya Marathi
केनियाच्या समबुरु कौंटीतील उमोजा गावात फक्त महिला राहतात.
उमोजा : काट्यांच्या कुंपणात असलेल्या केनियाच्या समबुरु कौंटीतील उमोजा गाव खूप खास आहे. यामागे कारण आहे येथे राहत असलेली एक मानवी जमात. यात फक्त महिलाच आहेत. गेल्या 26 वर्षांपासून येथे एकही पुरुष नाही. पूर्ण आफ्र‍िकेत सिंगल-सेक्स समुदाय असलेला हे एकच गाव आहे. येथे पुरुषांवर बंदी आहे. या गावाची कहाणी काय आहे...
- 1990 मध्‍ये या गावाची 15 अशा महिलांना राहण्‍यासाठी निवडण्‍यात आले. त्यांचा स्थानिक ब्रिटिश जवानांनी बलात्कार केला होता.
- यानंतर गाव पुरुषप्रधान समाजात हिंसेचा शिकार झालेल्या महिलांचे राहण्‍याचे ठिकाण बनले.
- तेव्हापासून बलात्कार, बालविवाह, कौटुंबिक हिंसा आणि खतना यासारख्‍या हिंसेची बळी ठरलेल्या महिला येथे राहत आहेत.
- केनियाची राजधानी नैरोबीपासून 380 किमी दूर समबुरु कौंटीत हे गाव आहे.
- या गावात 250 पेक्षा जास्त महिला व मुले राहत आहेत.
- येथे राहणा-या महिला हिंसा व पुरुष प्रधान समाजातील महिलांची जी स्थिती असते त्याविरोधात आहे.
अनेक संस्था चालवत आहे महिला
- येथे महिला प्राथमिक शाळांपासून सांस्कृतिक केंद्रांपर्यंत चालवत आहे.
- गावात महिला समबुरु नॅशनल पार्क पाहण्‍यासाठी येणा-या पर्यटकांसाठी कॅम्पेन साइटही चालवत आहेत.
- त्या गावाच्या फायद्यासाठी पारंपरिक दागदागिनेही विकतात. या गावाची आपली स्वत:ची वेबसाइटही आहे.
- या संस्थांच्या माध्‍यमातून नियमित उत्पन्न मिळते. यातून त्यांची दैनंदिन गरजा पूर्ण होतात. मात्र त्यांचा खर्च खूप मर्यादित असतो.
पर्यटक देतात प्रवेश शुल्क
- गावाच्या मुखिया नदीच्या काठावर कॅम्पसाइट चालवतात. येथे पर्यटकांचे ग्रुप थांबतात.
- सफारी फिरण्‍यासाठी आलेल्या पर्यटकाही गाव पाहण्‍यासाठी येत असतात. यांच्याकडून प्रवेश द्वारावर गावातील महिला प्रवेश शुल्क घेत असतात.
- गावातील महिलांना आशा आहे, की येथील हस्ताद्योग केंद्रात पर्यटक एक दिवस त्यांना बनवलेले दागदागिनेही खरेदी करतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...