आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kepler Data Reveals What Might Be Best Goldilocks Planet Yet

Earth2.0 : नासाने शोधला पृथ्वीचा भाऊ, पाणी आणि जीवन असण्याची आशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्वी (डावीकडे) आणि Kepler-452b (उजवीकडे) मध्ये अनेक साम्य आहेत. - Divya Marathi
पृथ्वी (डावीकडे) आणि Kepler-452b (उजवीकडे) मध्ये अनेक साम्य आहेत.
मियामी - अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने पृथ्वीसारख्या दुसऱ्या एका ग्रहाचा शोध घेतल्याचा दावा केला आहे. त्याला ‘कॅप्लर 452बी’ नाव देण्यात आले आहे. हा ग्रहदेखिल सूर्यमालेमध्येच आहे. संशोधनानुसार ‘कॅप्लर 452बी’ पृथ्वीप्रमाणेच चढ उताराचा पृष्ठभाग असलेला आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी सूर्यापासून जेवढी लांब आहे, तेवढाच हा ग्रह त्याच्या ता-यापासून लांब आहे. हा ग्रह फार गरमही नाही आणि अगदीच थंडही नाही. त्यामुळे याठिकाणी जीवन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पृथ्वीसारखे जीवन असण्याची शक्यता असल्यान त्याला Earth 2.0 असे नावही देण्यात आले आहे.

स्पेस टेलिस्कोप कॅप्लरने लावला शोध
पृथ्वीबाहेर जीवनाचा शोध घेण्याच्या नासाच्या या प्रयत्नांमध्ये या शोधाला चांगलेच महत्त्व असल्याचे समजले जात आहे. नासाचे स्पेस टेलीस्कोप कॅप्लरने या ग्रहाचा शोध लावला आहे. 2009 मध्ये ते लाँच करण्यात आले होते. 2015 मध्ये त्याने गोल्डिलॉक झोन (जीवन असण्याची शक्यता असलेले) आठ नवे ग्रह शोधले आहेत. 0.95 व्यास असलेले हे टेलीस्कोप सुमारे एक लाख ताऱ्यांच्या प्रकाशावर लक्ष्य ठेवून असते.

पृथ्वीशी किती साम्य
>सूर्याप्रमाणेच हा ग्रहदेखिल त्याच्या ताऱ्याभोवती फिरतो त्यासाठी त्याला 385 दिवस लागतात.
> याचा पृष्ठभागही पृथ्वीसारखाच उचं आणि सखल अशा आहे.
> Earth 2.0 चे तामानही पृथ्वीसारखेच आहे. ते जास्त गरम किंवा फार थंडही नाही. त्याठिकाणी असे वातावरण असल्याचे तेथे जीवन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काही महत्त्वाचे फरक
पृथ्वीकॅपलर 452बी
व्यास (डायमीटर)12,742 किमी20 हजार किमी (पृथ्वीपेक्षा 60% मोठा)
कक्षा (ऑर्बिट)365 दिवस385 दिवस (म्हणजे या ग्रहाचे वर्ष 20 दिवसांनी मोठे )
ग्रॅव्हीटेशनल फोर्स9.807 मी/ सेकंद स्क्वेअरपृथ्वीच्या तुलनेत दुप्पट

पुढील स्लाइड्सवर ग्राफीक्सद्वारे जाणून घ्या या नव्या ग्रहाबाबत...