आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नर्सरीच्या मुलांवर दारू ओतली अन् आग लावली; 6 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू, 25 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नर्सरीतील गार्डने चिमुकल्यांवर दारू ओतून त्यांना जिवंत जाळले. - Divya Marathi
नर्सरीतील गार्डने चिमुकल्यांवर दारू ओतून त्यांना जिवंत जाळले.
इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या जैनउबा शहरात शुक्रवारी हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. येथील नर्सरीत तैनात एका सुरक्षा रक्षकाने 6 चिमुकल्यांवर दारू ओतली आणि त्यांना पेटवून दिले. या घटनेत 4 मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर, इतर दोघांना रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वेदना असह्य झाल्याने त्यांचाही जीव गेला. या घटनेत चिमुकल्यांना पेटवून देणाऱ्या गार्डचाही आगीच्या भडक्यात जळून मृत्यू झाला. यासोबतच घटनास्थळी उपस्थित इतर 25 मुले आणि शिक्षिका सुद्धा जखमी झाल्या. त्यांच्यावर रुगणालयात उपचार सुरू आहेत. 
 

मानसिकरोगी होता गार्ड
>> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगदी नर्सरीच्या चिमुकल्यांवर दारू ओतून आग लावणारा गार्ड दामियाओ सांतोस (50) गेल्या 8 वर्षांपासून याच नर्सरीवर ड्युटी करत होता. 
>> सांतोस एक मानसिकरोगी होता. घटनास्थळाची चौकशी केल्यानंतर कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरावर सुद्धा धाड टाकली. यात अनेक मग भरून दारु सापडली आहे. 
 

पीडितांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी...
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या वेळी नर्सरीत 80 चिमुकले होते. घटनेची माहिती मिळताच पालक नर्सरीवर धडकले. मात्र, तोपर्यंत 4 मुलांचा होरपळून मृत्यू झाला. 2 जण गंभीर जखमी होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील सर्वच पीडित मुला-मुलींचे वय 5 वर्षांपेक्षा कमी होते. 
 

शहरात 7 दिवसांचा दुखवटा
>> जनउबा शहरातील मेयर कार्लोस मेंडेस यांनी घटनेवर शोक व्यक्त केला. तसेच वर्गात लागलेली आग एवढी भयंकर होती की मानसिकरोगी असलेला गार्ड सुद्धा जागीच ठार झाला. सुदैवाने इतर वर्गातील चिमुकले त्या खोलीत आले नाहीत. अन्यथा हानी आणखी मोठी झाली असती. 
>> घटनेनंतर मेयर कार्लोस यांनी शहरात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमर यांनीही ट्वीट करून शोक व्यक्त केला. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...