आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाच्या ताब्यात आहे अमेरिकेची ही युद्धनौका, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाच्या ताब्यात असलेली अमेरिकेची स्पायशीप 'प्यूबलो'... - Divya Marathi
उत्तर कोरियाच्या ताब्यात असलेली अमेरिकेची स्पायशीप 'प्यूबलो'...
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरिया अमेरिकी पोर्ट ग्वामावर हल्ला करण्याच्या स्थितीवरून उत्तर कोरिया आणि अमेरिकेत चांगलाच संघर्ष पेटला आहे. मात्र, अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्ष काही पहिल्यांदाच उद्भावला आहे असे नाही. वर्ष 1968 मध्ये तेथे अशीच स्थिती तयार झाली होती, जेव्हा तत्कालीन कोरियन हुकुमशहा किम इल-सुंगने अमेरिकन नेवीची एक युद्धनौका कॅप्चर केली होती. आताही सुमारे 50 वर्षानंतरही ही युद्धनौका उत्तर कोरियाच्या ताब्यात आहे आणि त्यांनी तिचे आता एका म्यूझियममध्ये रूपांतर केले आहे, जे उत्तर कोरियन लोकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. फोटोग्राफर मार्क एडवर्ड हॅरिसने या युद्धनौकेचे आतील काही फोटोज क्लिक केले होते जे आता समोर आले आहेत. टॉर्चर करून मारले होते सर्व क्रू मेंबर्स...
 
- प्यूबलो नावाची ही युद्धनौका अमेरिकेची स्पाय शिप होती, जिचे 1944 मध्ये डिझाईन केले होते. 
- सोवियत यूनियन (रशिया) सोबत तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकन नेवीने तिला मॉडिफाय करत आधुनिक बनवत अनेक शस्त्रांनी लैस केली होती. 
- असे करण्यामागे हाच उद्देश होता की, धोक्याच्या वेळी शत्रूंशी सामना करता यावा. यात 6 क्रू मेंबर्ससह 70 जवान तैनात असायचे.
- उत्तर कोरियाच्या दाव्यानुसार, 23 जानेवारी, 1968 रोजी ही शिप त्यांच्या समुद्री सीमेच्या आत 7.6 नॉटिकल माईल्स (सुमारे 14 किमी) पर्यंत आत घुसली होती. 
- या दरम्यान उत्तर कोरियाच्या अनेक युद्धनौकांनी तिला घेरले आणि अनेक तास चाललेल्या गोळीबारानंतर अमेरिकेचे सर्व जवान मारले गेले. तर वाचलेल्या क्रू मेंबर्सला अटक करण्यात आली. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रू मेंबर्सना कोरियन लष्कराने खूप टॉर्चर केले व नंतर मारून टाकले. मात्र, उत्तर कोरियाने दावा केला होता की, गोळीबारादरम्यानच सर्व जवान व क्रू मेंबर्स मारले गेले होते.
 
अमेरिकेने बनवला होता हल्ल्याचा प्लॅन- 
 
- सांगितले जाते की, ही युद्धनौका परत घेण्यासाठी अमेरिकेने उत्तर कोरियावर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र, त्यात सोवियत यूनियनने दखल दिल्याने अमेरिकेला मागे हटावे लागले.
- तेव्हापासून ही युद्धनौका उत्तर कोरियातच आहे. ही युद्धनौका पकडल्यानंतर अनेक वर्षे तिचा वापर कोरियन लष्कराने केला. 
- मात्र, आता तिचे आयुष्य संपल्यावर ही युद्धनौका उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील पोतोंग नदीत उभी आहे. आता या युद्धनौकेला म्यूझियममध्ये परावर्तित केली आहे. तसेच ही उत्तर कोरियाची ताकद म्हणून प्रदर्शित केले जाते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या युद्धनौकेचे आतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...