आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुकुमशहा किम म्हणाले, हम किसीसे कम नही, हायड्रोजन बॉम्ब बनवल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियोल- नॉर्थ कोरियाने हायड्रोजन बॉम्ब बनवल्याचा दावा केला आहे. प्योंगयांग स्टेटच्या मीडियाने देशाचे टॉप लीडर किम जोंग उनच्या हवाल्याने गुरुवारी ही माहिती दिली आहे. मिलिट्री साइटच्या पाहाणीसाठी आलेल्या किम यांनी हायड्रोजन बॉम्बसोबत आण्विकशक्ती आणखी वाढल्याचे सांगितले.

नॉर्थ कोरियाने यापूर्वी तिनदा आण्विक बॉम्बची (न्यूक्लियर बॉम्ब) चाचणी घेतली होती. यावेळी नॉर्थ कोरियाने शक्तिशाली शस्त्र बनवल्याचा अनेकदा दावा केला आहे. मात्र, हायड्रोजन बॉम्ब बनवल्याचा खुलासा पहिल्यांदा झाला.

अमेरिकन थिंक टँकने सप्टेंबरमध्ये व्यक्त केली होती शंका...
- वॉशिंग्टनमधील 'इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अॅण्ड इंटरनॅशनल सिक्युरिटी'ने (ISIS) गेल्या सप्टेंबरमध्ये नॉर्थ कोरियाने यांगयोन न्यूक्लियर कॉम्प्लेक्समध्ये शक्तीशाली शस्त्र विकसित होत असल्याची शंका व्यक्त केली होती.
-थिंक टॅंकने यासाठी सॅटेलाइट इमेजेसचा आधार घेतला होता. नॉर्थ कोरियाने आयसोटोप सेपरेशन फॅसिलिटी विकसित केली आहे. तिथे ट्रीटियम असल्याचे सांगितले जात आहे. ट्रीटियम हे थर्मोन्यूक्लियर शस्त्र बनवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रमुख भाग आहे.

काय आहे हायड्रोजन बॉम्ब?
हायड्रोजन अथवा थर्मोन्यूक्लियर बॉम्ब चेन रिएक्शन फ्यूजन असते. हायड्रोजन बॉम्ब हा न्यूक्लियरच्या तुलनेत अनेक पटीने विघातक असतो.

न्यूक्लियर शस्त्र येथे विकसित करतोय नार्थ कोरिया?
-नॉर्थ कोरिया व यूएसएसआर (सध्याचे रशिया) या दोन देशांमध्ये 1950 मध्ये एक करार झाला होता. त्यानंतर यांगयोन न्यूक्लियर रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली होती.
-यांगयोन न्यूक्लियर रिसर्च सेंटर 1964 मध्ये पूर्ण झा ले. सेंटरच्या निर्मितीसाठी सुमारे 3321 कोटी रुपये खर्च करण्‍यात आले होते.
-नॉर्थ कोरियाच्या न्यूक्लियर रिसर्च व डेव्हलपमेंटसाठी या सेंटरने महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.

2007 मध्ये बंद करण्यात आले होते रिएक्टर
नॉर्थ कोरियाची राजधानी प्योंगयांगपासून 90 किलोमीटर अंतरावरील यांगयोन रिएक्टरला 2007मध्ये बंद करण्‍यात आले होते. 'डेमोक्रेटिक पीपुल्स रिपब्लिक ऑफ कोरिया'ने 2013 पर्यंत रिएक्टर सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा..
-अमेरिकेसह यूके, फ्रान्स व रशियाने नॉर्थ कोरियाच्या न्यूक्लियर प्रोजेक्टला विरोध आहे.
-दरम्यान, नॉर्थ कोरियाकडे किती न्यूक्लियर शक्ति आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

नॉर्थ कोरियाचे सैन्यशक्ती
जवान10,00,000
टँक3,500
तोपा21,100
पाणबुडी72
युद्धनौका3
फायटर जेट563
बातम्या आणखी आहेत...