आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kirti Azad Answered Notice Of BJP, Denies All Charges

भाजपच्या नोटीसला किर्ती आझाद यांचे उत्तर, सर्व आरोप फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किर्ती आजाद (फाइल फोटो) - Divya Marathi
किर्ती आजाद (फाइल फोटो)
नवी दिल्ली - भाजपमधून निलंबित किर्ती आझाद यांनी पक्षाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिले आहे. आझाद यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळत स्वतःच्या निलंबनावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. डीडीसीएच्या घोटाळ्याबाबत अरुण जेटलींवर आरोप लावल्यानंतर किर्ती आझाद यांना निलंबित करण्यात आले होते. 14 दिवसांत त्यांच्याकडून उत्तरे मागवण्यात आली होती.

भाजपमधून निलंबनाचे कारण...
1. जेटलींवर आरोप
किर्ती आझाद यांनी डीडीसीएमध्ये घोटाळ्याप्रकरणी जेटलींवर आरोप केले होते. त्यावर भाजपने त्यांच्यावर अँटी पार्टी अॅक्टीव्हीटीचा आरोप केला होता. आझाद यांनी संसदेतही जेटलींवर आरोप केला होता. त्यांनी डीडीसीए घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. 1999 पासून 2013 पर्यंत अरुण जेटली डीडीसीएचे अध्यक्ष होते.
2. सोनियांना भेटल्याचा आरोप
जेटली म्हणाले होते की, पक्षाचे एक खासदार सोनिया गांधींना भेटले आहेत. त्या दोघांमध्ये मला अडकवण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र जेटलींनी आझाद यांचे नाव घेतले नाही. किर्ती आझाद यांनी आधीच सोनियांना भेटल्याचा आरोप फेटाळला होता.
3. मनाई करूनही घेतली पत्रकार परिषद
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मनाई करूनही आझाद यांनी डीडीसीएच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत किर्ती आझाद यांनी डीडीसीएवर 14 खोट्या कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.

किर्ती यांनी नोटीसला दिलेले प्रत्युत्तर...
- बिहार निवडणुकीनंतर मी नेतृत्वावर कोणतेही प्रश्नचिन्हं उपस्थित केले नाही.
- 21 डिसेंबरच्या लोकसभेच्या कामकाजात मी भाग घेतला.
- डीडीसीए प्रकरणाचा पक्षाशी काहीही संबंध नाही.
- कोणत्याही पत्रकार परिषदेत मी भाजप किंवा जेटलींचे नाव घेतले नाही.
- किर्ती आझाद यांनी आपल्या उत्तरासह चार सीडी आणि तीन लेटरही पाठवले आहेत.

निलंबनानंतर काय म्हणाले होते आझाद...
भाजपमधून निलंबित झाल्यानंतर किर्ती आझाद यांनी जोरदार टीका केली होती. कोणत्याही नोटीसशिवाय निलंबनाच्या कारवाईची तुलना ISIS या दहशतवादी संघटनेशी केली होती. पक्ष ISIS बनला आहे का, असा सवाल त्यांनी केला होता.