आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाशकारी वादळांच्या पोटात शिरते हे विमान, जमा करते वातावरणातील बदलाची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो, जगाच्या पाठीवर समुद्रात आणि जमिनीवर विविध प्रकारची लहान मोठी वादळे होत असतात. यातील काही खूपच विध्वंसक असतात. अशाच विनाशकारी वादळापैकी एक म्हणजे हरिकेन. टायफून, ट्रॉपिकल स्टॉर्म, सायक्लोनिक स्टॉर्म किंवा सायक्लोन अशा विविध नावानेही ही वादळे ओळखली जातात.
उत्तर अटलांटिक महासागर आणि पूर्व पश्चिम प्रशांत महासागरात चक्राकार पद्धतीने ही वादळे उठतात विध्वंस करतात. या वादळावर लक्ष ठेवण्यासाठी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ याची एक टीम नेहमीच दक्ष असते. अत्यंत सुसज्ज आधुनिक उपकरणे असलेल्या विमानातून हा चमू वातावरणाचे सर्व बदल बारकाईने नोंदवत असतो. ही टीम 'नोवा हरिकेन हंटर' या नावाने ओळखली जाते. अमेरिकेच्या एअर फोर्समध्ये "53rd Weather Reconnaissance Squadron' या नावाची एक खास प्रशिक्षित तुकडी आहे. जी अशा वादळांचा चक्क पाठलाग करून माहिती जमा करते. १९४६ पासून त्यांना हरिकेन हंटर हे नाव मिळाले.
या कामगिरीसाठी 'लॉकहिड डब्ल्यूसी-१३० जे' नावाचे एक खास विमान वापरले जाते. अशा प्रकारच्या वादळाच्या पोटात शिरून हे विमान सर्व प्रकारच्या हवामानाचा तपशील गोळा करण्यास मदत करते. अशा प्रकारच्या वादळाचा अभ्यास करण्याची ही कल्पना सर्वप्रथम कॅप्टन डब्ल्यू. एल. फार्नस्वोर्थ यांनी १९३० च्या दशकात मांडली होती. हरिकेन हंटरमुळे आज अशा विनाशकारी वादळाची पूर्वसूचना मिळून हजारो लोकांचे प्राण वाचवता येतात.

पुढील स्लाईडवर पाहा, नोवा हरिकेन हंटरचे विविध फोटो..